लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विधानसभेच्या हिंगणघाट, आर्वी, देवळी व वर्धा या चार जागांसाठी सोमवारी प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्ह्यातील ५३.९८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे. मात्र, रात्री उशिरापर्यंत काही ठिकाणी मतदान सुरू राहिल्याने जिल्ह्याची मतदानाची ही सरासरी ६३ टक्के होण्याची शक्यता अधिकाऱ्यांकडून वर्तविली जात आहे.जिल्ह्यातील काही मतदान केंद्रांवरील मशीन मध्ये सुरूवाला नाममात्र तांत्रिक बिघाड आला. परंतु, वेळीच सदर तांत्रिक बिघाड दूर करून मतदान प्रक्रीया सुरळीत करण्यात आली. हिंगणघाट विधानसभा मतदार संघातील काही ठिकाणावरील मशीन मध्ये तांत्रिक बिघाड आल्याने सहा मशीन तातडीने बदलविण्यात आल्या. देवळी विधानसभा मतदान क्षेत्रातील सोनेगाव आबाजी येथील मतदान केंद्रावरील ईव्हीएमची बॅटरी डाऊन झाल्याने त्याचा मतदान प्रक्रियेवर परिणाम पडला होता. अधिकाऱ्यांनी वेळीच पर्यायी व्यवस्था करून मतदान प्रक्रिया सुरळीत केली. तर वर्धा विधानसभा क्षेत्रातील सालोड (हि.) येथे दोन गटात शाब्दिक चकमक उडाली होती; पण त्यानंतर पोलिसांनी वेळीच परिस्थितीवर नियंत्रण मिळविल्याचे सांगण्यात आले. सोमवारी सकाळी ७ वाजतापासून प्रत्यक्ष मतदानाला सुरूवात झाली. सोमवारी सकाळी ७ ते ९ या कालावधीत ५.४८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असला तरी जसजसा सूर्य डोक्यावर येत मावळतीला गेला, तसतसा जिल्ह्याचा मतदानाचा टक्का वाढत गेला. दिव्यांग तसेच रुग्ण असलेल्या मतदारांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून व्हिलचेअरची व्यवस्था मतदान केंद्रावर करण्यात आली होती. इतकेच नव्हे तर वयोवृद्ध मतदानांना सहकार्य करण्याचे काम काही ठिकाणी रासेयोच्या विद्यार्थ्यांनी केले. सोमवारी लोकशाहीच्या या उत्सवाला विविध जाती-धर्माच्या नागरिकांनी, वयोवृद्ध, दिव्यांग, नवमतदार तसेच शेतकरी व शेतमजुरांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सायंकाळी ५ वाजेपर्यंत आर्वी विधानसभा क्षेत्रात ६०.२७ टक्के, देवळी विधानसभा क्षेत्रात ५५.३४, हिंगणघाट मतदार संघात ५३.४५ टक्के तर वर्धा विधानसभा क्षेत्रात ४८.०७ टक्के मतदान झाले. तशी नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली असून जिल्ह्यात एकूण किती टक्के मतदान झाले याची माहिती वृत्तलिहिस्तोवर अधिकाºयांकडून घेतली जात होती.याद्यांमधील घोळामुळे सहन करावा लागला मनस्तापच्सोमवारी प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी काही मतदारांसाठी निवडणूक विभागाकडून उपलब्ध करून देण्यात आलेली सूविधा फायद्याची ठरली असली तरी अनेक मतदारांना मतदार यादीत नाव शोधण्यासाठी चांगली माथापच्छी करावी लागल्याचे वास्तव आहे. एकूणच यादीमध्ये नाव शोधण्यासाठी चांगलाच मनस्ताप मतदारांना सहन करावा लागला.आगरगावच्या ग्रामस्थांची मतदानाकडे पाठकारंजा (घा.) तालुक्यातील आगरगाव येथील ग्रामस्थांनी सोमवारी मतदानाकडे पाठ दाखविली. या गावातील एका तरुणाला वाघाने नुकतेच ठार केले. शिवाय हे गाव जंगलव्याप्त परिसरात असल्याने नेहमीच वन्यप्राण्यांकडून उभ्या पिकांची नासडी केली जाते. त्यामुळे वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासह दिवसाला कृषीपंपाला विद्युत पुरवठा करण्यात यावा यासह अन्य मागण्या आगरगाव येथील ग्रामस्थांच्या आहेत. परंतु, त्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानली जात असल्याने सोमवारी आगरगाव येथील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत कुठलाही शासकीय अधिकारी आगरगावच्या ग्रामस्थांच्या मागण्या जाणून घेण्यासाठी आला नसल्याने आगरगावच्या एकाही नागरिकाने मतदान केले नाही. विशेष म्हणजे आगरगाव येथील मतदान केंद्र क्रमांक १४५ ची एकूण मतदार संख्या ४२५ इतकी आहे.पहिल्या दोन तासात ५.४८ टक्के मतदानसोमवारी विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत मतदान घेण्यात आले. असे असले तरी जिल्ह्यातील वर्धा, हिंगणघाट, देवळी व आर्वी या चार विधानसभा क्षेत्रातील एकूण ११ लाख ४९ हजार ७५८ मतदारांपैकी ५.४८ टक्के मतदारांनी सकाळी ७ ते ९ या कालावधीत मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य बजावले.
Maharashtra Election 2019 : जिल्ह्यात सरासरी ६३ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 05:00 IST
हिंगणघाट विधानसभा मतदार संघातील काही ठिकाणावरील मशीन मध्ये तांत्रिक बिघाड आल्याने सहा मशीन तातडीने बदलविण्यात आल्या. देवळी विधानसभा मतदान क्षेत्रातील सोनेगाव आबाजी येथील मतदान केंद्रावरील ईव्हीएमची बॅटरी डाऊन झाल्याने त्याचा मतदान प्रक्रियेवर परिणाम पडला होता. अधिकाऱ्यांनी वेळीच पर्यायी व्यवस्था करून मतदान प्रक्रिया सुरळीत केली. तर वर्धा विधानसभा क्षेत्रातील सालोड (हि.) येथे दोन गटात शाब्दिक चकमक उडाली होती;
Maharashtra Election 2019 : जिल्ह्यात सरासरी ६३ टक्के मतदान
ठळक मुद्देकाही ठिकाणी मशीनमध्ये तांत्रिक बिघाड : सालोड (हिरापूर) येथे उडाली शाब्दिक चकमक