शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; ४७ उमेदवारांचा आज फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 06:00 IST

मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून मतमोजणीच्या ठिकाणी पोलिसांचा तगडा बदोबस्त राहणार आहे. विशेष म्हणजे १४ टेबलवरून मतमोजणीची ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. ज्यांच्याकडे निवडणूक विभागाचे ओळखपत्र त्यांनाच मतमोजणी स्थळाच्या परिसरात प्रवेश राहणार आहे.

ठळक मुद्देप्रशासन सज्ज : १४ टेबलावरून चार ठिकाणी होणार मतमोजणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील आर्वी, देवळी, हिंगणघाट व वर्धा या चार विधानसभा मतदार संघाच्या सार्वत्रिक निवडणुकीचा महत्त्वाचा भाग असलेला मतमोजणी प्रक्रिया गुरूवार २४ ऑक्टोबरला होणार आहे. वर्धा जिल्ह्यातील चार जागांसाठी एकूण ४७ उमेदवार निवडणूक रिंगणात असून मतमोजणीअंती मतदारांच्या बहुमताचा कौल स्पष्ट होणार आहे.मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून मतमोजणीच्या ठिकाणी पोलिसांचा तगडा बदोबस्त राहणार आहे. विशेष म्हणजे १४ टेबलवरून मतमोजणीची ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. ज्यांच्याकडे निवडणूक विभागाचे ओळखपत्र त्यांनाच मतमोजणी स्थळाच्या परिसरात प्रवेश राहणार आहे.सकाळी ८ वाजतापासून होणार मतमोजणीगुरूवारी सकाळी ८ वाजतापासून वर्धा जिल्ह्यातील चार ठिकाणी मतमोजणी होणार आहे. वर्धा विधासभेची मतमोजणी भारतीय खाद्य निगमच्या गोदाम परिसरात, देवळी विधानसभेची मतमोजणी तहसील कार्यालय देवळी, हिंगणघाटची उपविभागीय कार्यालय हिंगणघाट तर आर्वी विधानसभेची मतमोजणी शासकीय तंत्र निकेतन महाविद्यालय येथे होणार आहे. सदर मतमोजणीची प्रक्रिया वर्धा येथे निवडणूक निर्णय अधिकारी सुरेश बगळे, देवळीत मनोज खैरणार, हिंगणघाटात चंद्रभान खंडाईत तसेच आर्वी येथील मतमोजणी हरिश धार्मिक यांच्या नेतृत्वात होणार आहे.जास्तीत जास्त होणार २५ फेऱ्यामतदारांच्या संख्येनुसार मतमोजणीच्या फेऱ्या होणार आहे. यात वर्धा २५ फेऱ्या, देवळीत २४, हिंगणघाटात २५ व आर्वी २२ फेºया होणार आहेत.१६८ अधिकारी पाहणार कामप्रथम टपाली मतदानाची मोजणी होणार आहे. तर त्यानंतर ईव्हीएममधील मतमोजणी केली जाणार आहे.आर्वी विधानसभा मतदार क्षेत्रात ६७.२५ टक्के मतदान झाले आहे.देवळी विधानसभा मतदार क्षेत्रात ६३.४९ टक्के मतदान झाले आहे.हिंगणघाट मतदार क्षेत्रात ६४.५१ टक्के मतदान झाले आहे.वर्धा विधानसभा क्षेत्रात ५३.१४ टक्के मतदान झाले आहे.जिल्ह्यातील एकूण मतदान ११ लाख ४९ हजार ९५८ इतके आहे.जिल्ह्यात यंदा एकूण ७ लाख १० हजार २१९ मतदान झाले आहे.जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी ६१.७६ इतकी आहे.जिल्ह्यातील चार ठिकाणी होणार मतमोजणीएका टेबलवर राहणार तिघांची नजरमतमोजणीसाठी प्रती टेबर दोन मतमोजणी अधिकारी व एक सुक्ष्म निरिक्षक असे तीन अधिकारी काम पाहणार आहे. एकूणच १४ टेबलवर एकूण ४२ अधिकारी एका विधानसभेसाठी तर चार विधानसभेसाठी एकूण १६८ अधिकारी मतमोजणीचे काम पाहणार आहेत.

टॅग्स :wardha-acवर्धा