शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

महाआॅनलाईनकडून बेरोजगार युवकांची फसवणूक

By admin | Updated: December 25, 2014 23:36 IST

महाआॅनलाईन संस्थेने महा-ई-सेवा केंद्रामार्फत तालुक्यातील शेकडो बेरोजगार युवकांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. यात फसवणूक झालेल्या युवकांनी पैसे परत करण्याची मागणी केली आहे.

समुद्रपूर : महाआॅनलाईन संस्थेने महा-ई-सेवा केंद्रामार्फत तालुक्यातील शेकडो बेरोजगार युवकांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. यात फसवणूक झालेल्या युवकांनी पैसे परत करण्याची मागणी केली आहे.महाआॅनलाईनच्या संकेतस्थळावर ‘उम्मीद रोजगार’ या मथळ्याखाली औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेतलेल्या युवकांसाठी विविध कामाचे प्रशिक्षण, नोकरीची हमी व आकर्षक वेतन, अशी जाहिरात टाकण्यात आली. तालुक्यातील विविध महा-ई-सेवा केंद्रामार्फत आयटीआयधारक युवकांची उम्मीद रोजगारासाठी ३४०० रुपये शुल्क घेऊन नोंदणी करण्यात आली. नोंदणीच्या संगणकीकृत पावत्या देण्यात आल्या. येथे नोंदणी झालेल्या युवकांना प्रशिक्षण देण्यात येईल, असे नमूद करण्यात आले होते. समुद्रपूर येथील महा-ई-सेवा केंद्र चालक चंद्रशेखर हातेकर नोंदणी झालेल्या सुमारे ६० तरुणांना घेऊन प्रशिक्षणासाठी मुंबईला गेले. तेथे प्रशिक्षणासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नसून प्रशिक्षणानंतर नोकरीची हमी घेतली जात नसल्याचे संस्थेच्या प्राचार्यांनी सांगितले. संकेत स्थळावर नमूद ट्रेड व्यतिरिक्त इतर ट्रेडचे प्रशिक्षण येथे देण्यात आले. फसवणूक झालेल्या तरुणांनी पैसे परत मिळविण्यासाठी धावपळ सुरू केली़ यासाठी बेरोजगार संबंधित महा-ई-सेवा केेंद्रात चकरा मारत आहे़ प्रशिक्षणासाठी प्रती विद्यार्थी ३४०० रुपये महाआॅनलाईनकडून घेण्यात आले. सदर रक्कम परत करण्याची मागणी युवकांनी निवेदनातून केली़ निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी महाआॅनलाईन प्रा.लि. मुंबई यांना देण्यात आले़ फसवणूक झालेल्यांची रक्कम १६ जानेवारीपर्यंत परत मिळवून देण्याची हातेकर यांनी लेखी हमी दिली आहे.(तालुका प्रतिनिधी)