अनुदानावरील बियाणे : शेतकऱ्यांकडून आर्थिक मदतीची मागणी अल्लीपूर : शासनाच्या योजनेनुसार अल्पभूधारक शेतकऱ्यांना अनुदानावर महाबीजचे बियाणे मिळाले. ते बियाणे शेतकऱ्यांनी पेरले; मात्र ते उगविलेच नाही. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. शासनाच्यावतीने या शेतांची पाहणी करून आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे. गावातील किसना लोणारे, बहादे, वंजारी व इतर शेतकऱ्यांनी पेरलेल्या महाबीजच्या सोयाबीन बियाण्यांची पेरणी करून आठ ते पंधरा दिवस होऊनही उगवण झाली नाही. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागला. महामंडळाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी मंडळ कृषी अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. शिवाय कृषी सहायक व कंपनीच्या तज्ज्ञांनी पिकांची पाहणी करून शेताचे पंचनामे करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.(वार्ताहर)
महाबीजचे सोयाबीन अंकुरलेच नाही
By admin | Updated: July 11, 2016 01:59 IST