शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

मदनी फाट्यावर रोखली एसटी

By admin | Updated: September 18, 2016 00:55 IST

मदना या गावात पोहोचण्यासाठी परिवहन महामंडळाच्या पाच बसफेऱ्या आहेत. गावात बसच्या चार फेऱ्या नियमित होतात;

पालक, विद्यार्थ्यांचे आंदोलन : बस गावात येत नसल्याने पायपीटआकोली : मदना या गावात पोहोचण्यासाठी परिवहन महामंडळाच्या पाच बसफेऱ्या आहेत. गावात बसच्या चार फेऱ्या नियमित होतात; पण शाळकरी व महाविद्यालयीन वेळेत असणारी १० वाजताची एसटी चालक हेकेखोरपणे गावात आणत नव्हता. परिणामी विद्यार्थ्यांना तीन किमी अंतर पायी चालून मदनी फाट्यावर यावे लागत होते. यामुळे संतप्त पालक विद्यार्थ्यांनी शनिवारी मदनी फाट्यावर आंदोलन करीत एसटी रोखली. नागरिकांचा संताप पाहून चालकाने प्रकरण चिघळू नये म्हणून अखेर बस मदना गावात नेली.मदना हे गाव मदनी फाट्यापासून आत आडवळणावर आहे. इतर प्रवासी साधने नाही. गावात येण्यासाठी चार बसफेऱ्या आहे. इतर चालक गावात बसेस नियमित आणतात; पण मंगळवार, बुधवार व शनिवारी राजू दौड नामक वाहक हेकेखोरपणा करून गावात बस आणत नव्हता. यामुळे विद्यार्थ्यांना ३ किमी पायपीट करून मदनी पाटी गाठून त्याच बसने वर्धा, दिनकरनगर येथे जावे लागत होते. सदर बसची वेळ विद्यार्थ्यांना सोईची असताना चालक जाणीवपूर्वक मदना गावात बस नेत नव्हता. यामुळे पालकांत संताप होता. अखेर माळेगाव (ठेका) कडून येणारी वर्धा बस विद्यार्थी, पालकांनी मदनी फाट्यावर रोखून धरीत संताप व्यक्त केला. वाहकाने चुकीबद्दल माफी मागितली व लगेच बस मागे वळवून मदना गावात नेली. दर्शन हिंगे, पुर्वेश सकंडे, भुषण कोंडतकर, हेमा खेलकर, शितल भुरे, तेजस मानकर, दर्शन डोंगरे, प्रणाली सुरजूसे, प्रणाली गोटे, विभा पवार या विद्यार्थ्यांसह पालक तानबिन विहान, प्रकाश मसराम, महादेव आत्राम, प्रल्हाद गिरी, शोभा मानकर, शकुंतला मदनकर, रत्नमाला मदनकर यांनी आंदोलनात भाग घेतला.(वार्ताहर)वाहकाच्या उर्मटपणाचाही आला विद्यार्थ्यांना तिटकारामदना गावात एसटी न घेऊन जाता फाट्यावर आलेल्या विद्यार्थ्यांशीही वाहक उर्मटपणे बोलत असल्याच्या तक्रारी विद्यार्थिनींनी केल्या. विद्यार्थ्यांना कंबरेत लाथ घालू का, विद्यार्थिनींना शेंबडे दार लाव अशी भाषा वाहक वापरत असल्याने विद्यार्थी त्रस्त झाले होते. सदर वाहक कुणालाही जुमानत नसून वयोवृद्धांनाही घरीही अशीच बडबड करतात, असे म्हणून त्रस्त करीत होता. विद्यार्थ्यांना शिवीगाळ करणे आणि विद्यार्थिनींना अशोभनीय बोलण्याचे प्रकार नित्याचेच झाले होते, अशा तक्रारी विद्यार्थिनींनी केल्यात. या प्रकरणी राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करावी व सदर वाहकावर कार्यवाही करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली.