शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

‘मॅडम’! बीपीएलचे कार्ड मिळेल काय?

By admin | Updated: July 26, 2016 01:49 IST

सुजातपूर येथील ६८ वर्षीय राजेंद्र घोंगे हे भूमिहीन आहेत. दुसऱ्याकडे मजुरी करून उदरनिर्वाह सुरू आहे.

सुजातपूरच्या शेतमजुराचा सवाल : दोन वर्षांपासून तहसीलमध्ये चकराआष्टी (शहीद) : सुजातपूर येथील ६८ वर्षीय राजेंद्र घोंगे हे भूमिहीन आहेत. दुसऱ्याकडे मजुरी करून उदरनिर्वाह सुरू आहे. गत दोन वर्षांपासून ते तहसील कार्यालयात बीपीएल कार्डसाठी चकरा मारत आहेत; पण अद्याप त्यांना कार्ड देण्यात आले नाही. परिणामी, त्यांच्या कुटुंबावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. या प्रकरणी कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी निवेदनात केली आहे.घोंगे यांच्याकडे पूर्वी बीपीएल कार्ड होते. मागील सर्व्हेमध्ये त्यांचे नाव गहाळ झाले. शेती असलेल्या श्रीमंतांना बीपीएल कार्ड मिळाले; पण राजेंद्र यांना परिस्थिती सुधारल्याचे दर्शवित बीपीएल कार्ड मिळणार नाही, असा सल्ला सर्व्हे करणाऱ्या चमूने दिला. यासाठी त्यांनी तहसीलदार कार्यालयात अर्ज केला. त्यांना भूमिहीन असल्याचे प्रमाणपत्र मिळाले. महसूल विभागाकडून अधिकृत पुरावा मिळाला. तो दाखविला तरी कार्ड देता येणार नाही, असे पुरवठा विभागाकडून सांगण्यात येत आहे. शेतमजूराने सर्व परिस्थिती सांगूनही कुणी ऐकून घ्यायला तयार नाही.अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजांतील अन्न ही गरज भागावी म्हणून रेशनकार्ड मागणाऱ्या घोंगे यांना तहसीलच्यास कर्मचाऱ्यांनी हाकलून लावले. माणुसकी हरविलेले प्रशासन निगरगट्ट झाले आहे. सामान्य जनतेचे प्रशासन राहिले नसल्याच्या प्रतिक्रिया जनमानसात उमटत आहेत. बीपीएल राशन कार्डकरिता त्यांनी तहसीलदार सीमा गजभिये यांची भेट घेऊन ‘मॅडम राशन कार्ड द्या’, अशी विनवणी केली. यावेळी त्यांना नियमाप्रमाणे काम होईल, असे सांगण्यात आले. भूमिहीन असल्याने कुटुंबाचे उत्पन्न अत्यंत कमी आहे. घरात कमविणारे राजेंद्र एकमेव आहेत. यामुळे प्रशासनाने न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी निवेदनातून वरिष्ठांना केली आहे. दोन वर्षांपासून बीपीएल शिधापत्रिकेसाठी तहसील कार्यलयाच्या चकरा मारणाऱ्या वृद्धाला न्याय मिळणार काय, याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.(तालुका प्रतिनिधी)प्रत्येक नागरिकाला राशनकार्ड मिळावे, हा मूलभूत अधिकार आहे. गेल्या दोन वर्षांपासून राशन कार्ड न देणे, ही बाब गंभीर आहे. तहसीलदार यांना तात्काळ आदेश देतो.- मनोहर चव्हाण,उपविभागीय महसूल अधिकारी, आर्वी.