शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकरानेच काढला ‘संध्या’चा काटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 23:22 IST

पिपरी (मेघे) भागातील पिपल्स फॉर अ‍ॅनिमल्सच्या करुणाश्रमाच्या शेजारी असलेल्या मोकळ्या मैदानात बुधवारी संध्या महादेव पाटील (तेलंग) रा. गजानननगर हिचा मृतदेह आढळून आला होता. संध्याची गाळा आवळून हत्या करण्यात आल्याचे पुढे येताच पोलिसांनी तपासाचे चक्र फिरविले.

ठळक मुद्देआरोपीला अटक : सात वर्षांपासून होती जवळीक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पिपरी (मेघे) भागातील पिपल्स फॉर अ‍ॅनिमल्सच्या करुणाश्रमाच्या शेजारी असलेल्या मोकळ्या मैदानात बुधवारी संध्या महादेव पाटील (तेलंग) रा. गजानननगर हिचा मृतदेह आढळून आला होता. संध्याची गाळा आवळून हत्या करण्यात आल्याचे पुढे येताच पोलिसांनी तपासाचे चक्र फिरविले. यात अवघ्या १२ तासातच पोलिसांनी संध्याचा मारेकरी शोधून त्याला अटक केली. गिरीष वसंत बिडवाईक (४८) रा. लहरीनगर असे आरोपीचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली. संध्या आणि गिरीष यांच्यातील अनैतिक संबंधातून तिच्या हत्येची कबुली आरोपीने दिली.रामनगर येथील संजय तेलंग याच्याशी संध्या पाटील हिचा सुमारे ३० वर्षांपूर्वी प्रेम विवाह झाला होता. परंतु, पती संजयला असलेल्या दारूचे व्यसन व त्यापासून होणारा त्रास याला कंटाळून संध्या लग्नाच्या काही वर्षानंतर वेगळी राहायला लागली. २० वर्षांपासून ती माहेरी राहत होती. याच कालावधीत संध्याने पोस्ट विभागाच्यावतीने चालविण्यात येणाऱ्या आरडीचे अधिकृत अभिकतृत्त्व स्विकारले. याच कालावधीत शहरातील मानसमंदिर भागातील पोस्ट आॅफिस येथे पोस्ट मास्टर म्हणून कार्यरत असलेल्या गिरीष बिडवाईक याच्याशी तिचे सूत जुळले. सुमारे सात वर्षापूर्वीपासूनच्या संध्या व गिरीष यांच्यातील प्रेमसंबंधात गिरीषची नाशिक येथे बदली झाल्याने थोडा दुरावा निर्माण झाला.याच दुराव्यामुळे काही दिवसांपासून संध्या गिरीष याला वेठीस धरत होती. तिच्या या जाचाला कंटाळून अखेर संध्याला जीवानीशी ठार करण्यात आल्याचे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे. पुढील तपास ठाणेदार विजय मगर यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी करीत आहेत.घटनेच्या दिवशी गेले होते फिरायलानाशिक येथे गिरीषची बदली झाल्याने तेथे मलाही घेऊन चाल अशी गळ मृतक संध्याकडून लावली जात होती. याच कारणामुळे सुमारे सात वर्षांपासून संध्या व गिरीष यांच्यातील अनैतिक संबंधात काहीसा दुरावा आला होता. घटनेच्या दिवशी मृतक संध्या व गिरीष हे दोघेही सुकळी येथे फिरायला गेले होते. दरम्यान दोघांचा वाद झाला. याच वादादरम्यान गिरीषने संध्याचा गळा आवळून हत्या केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.संध्याचा मोबाईल आणि वाहन ठरते महत्त्वाचेपोलीस तपास सुरू असताना मृतक संध्याचा मोबाईल आणि तिचे वाहन तपासाकरिता महत्त्वाचे ठरले. या दोन्ही बाबींच्या माध्यमातूनच आरोपीपर्यंत पोहोचणे पोलिसांना शक्य झाले.घटनास्थळीच मारलेसंध्याचा मृतदेह ज्या ठिकाणी सापडला त्या ठिकाणी तो आणून टाकला अथवा तिची तिथेच हत्या करण्यात आली याचा तपास पोलिसांकडून करण्यात आला असता तीची घटनास्थळीच हत्या केल्याचे समोर आले आहे.आरोपीला ५ मे पर्यंत पीसीआरगिरष बिडवाईक याला अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्याला पुढील तपासाकरिता न्यायालयाने ५ मे पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.पुरावे नष्ट करण्याचा झाला प्रयत्नगिरीष बिडवाईक याला ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. संध्याचा काटा काढल्यानंतर गिरीषने संध्याचा मोबाईल पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने इतर ठिकाणी फेकुन दिल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे.

टॅग्स :Murderखून