भरपाईची मागणी : सिंचनाअभावी पिके धोक्यात साहुर : अप्पर वर्धा धरणामध्ये येथील काही शेतकऱ्यांची शेती व घरे गेली. उरल्या सुरल्या शेतीत या शेतकऱ्यांनी संत्राबाग फुलविली. परंतु शेत सपाटीकरणाच्या नावाखाली या शेतकऱ्यांच्या शेतातील सर्वच पाईपलाईन फोडण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले असून भरपाईसाठी अधिकाऱ्यांचे उंबरठे झिजवावे लागत आहे़सुरेश पोटे, लता पोटे, केशव पारिसे, अशोक पोटे, पुंडलिक पाचारे, गुलाब सामुद्रे, दिलीप पारिसे, भास्कर भालेराव, उमेश भालेराव, मधुकर घुडे, बाबुराव घुडे या शेतकऱ्यांनी वर्धा अप्पर धरणावरून गेल्या २० वर्षापासून पाईपलाईनद्वारे पाणी घेऊन आपल्या शेतात नंदनवन फुलविले़ सर्व शेतकऱ्यांच्या पाईप लाईन दिलीप नागपुरे यांचे शेतातून गेल्या आहे़ परंतु नागपुरे यांनी जेसीबीद्वारे शेतीचे सपाटीकरण करताना सदर पाईप पूर्णपणे तुटले. आकसापोटी हा प्रकार केल्याचा आरोप सदर शेतकऱ्यांनी केला असून सिंचनाचा प्रश्न निर्माण होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नागपुरे यांचेवर योग्य कारवाई करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहे.(वार्ताहर)
पाईपलाईन फोडल्याने शेतकऱ्याचे नुकसान
By admin | Updated: April 25, 2015 00:06 IST