नुकसानाची पाहणी : विभागीय आयुक्तांची पिंपरी, आगरगावला भेटवर्धा : पुलगाव येथील स्फोटाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी आणि आगरगावला बुधवारी विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी भेट देत ग्रामस्थांसोबत चर्चा केली. स्फोटामुळे १६३ घरांना तडे गेले असून याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. शिवाय आवाजमुळे ग्रामस्थांना त्रास होऊ नये, यासाठी आरोग्य तपासणी करण्यासाठी विशेष वैद्यकीय शिबिर सुरू करण्याच्या सूचना दिल्यात. नागरिकांना उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देण्याबाबतही त्यांनी सूचना दिल्यात. यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषदेचे प्रमोद पवार, गटविकास अधिकारी शिंदे, तहसीलदार तेजस्विनी जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)आगरगाव ३३७, पिंपरी ९२, नागझरी १७, घरांच्या नुकसानीसंदर्भात बांधकाम विभाग, महसूल, ग्रामसेवक सक्त पाहणी करून अहवाल सादर करणार आहेत.
स्फोटाच्या हादऱ्याने १६३ घरांचे नुकसान
By admin | Updated: June 2, 2016 00:46 IST