शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

चालानच्या नावावर ग्रामीण वाहनचालकांची लूट

By admin | Updated: November 15, 2015 01:33 IST

शहरी युवक पोलिसांच्या समोर भरधाव जातात. त्यांना अडविले जात नाही; पण ग्रामीण भागातील दुचाकीस्वारांना कारण नसताना थांबविले जाते.

वाहतूक पोलिसांची दहशत : दुचाकी घरी ठेवून आॅटोने प्रवासआकोली : शहरी युवक पोलिसांच्या समोर भरधाव जातात. त्यांना अडविले जात नाही; पण ग्रामीण भागातील दुचाकीस्वारांना कारण नसताना थांबविले जाते. अधिक रकमेच्या चालाणची भीती दाखवून पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवून अवैध वाहतूक करणाऱ्या काळी-पिवळी, आॅटो सोडून दुचाकी चालकांवरच अधिक कारवाई होताना दिसते. यामुळे ग्रामीण नागरिक दुचाकी घरी ठेवून आॅटोने भुर्दंड सोसत शहरात जात असल्याचे दिसते.वाहनांचे लोन आता ग्रामीण भागातही पसरले आहे. दारासमोर बैलजोडी दिसणार नाही; पण दुचाकी हमखास दिसते, अशी स्थिती आहे. ग्रामीण भागातही प्रत्येक घरी दुचाकी असल्याचे दिसते. वाहतूक सोईची व्हावी म्हणून वाहनांचा वापर वाढत असला तरी वाहन चालकांना पोलिसांच्या जाचाला सामोरे जावे लागत आहे. याच प्रकारामुळे ग्रामीण भागातील नागरिक घरी मोटारसायकल असताना आॅटोने प्रवास करताना दिसतात. शहरात कोणत्याही रस्त्याने गेले तरी वाहतूक पोलीस शिपाई ग्रामीण नागरिकांना अडवितात. या प्रकारामुळे अनेक युवक त्रस्त झाले आहेत. कागदपत्राची चौकशी करताना एखादा कागद नसला तरी त्याला १२०० रुपयांची चालाण फाडावी लागेल, असे सांगून २०० ते ५०० रुपये घेत सोडले जात असल्याचे ग्रामीण युवक सांगतात. दुसरीकडे शहरी युवक वाहतूक भरधाव जात असताना त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याचे दिसते. वाहतूक शाखेतील काहींमुळे पोलीस खात्याची प्रतिमा मलीन होत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी याची दखल घेत वाहतूक पोलिसांच्या कारवायांना आवर घालावा, अशी मागणी ग्रामीण वाहन चालकांकडून करण्यात येत आहे.(वार्ताहर)शेतमाल आणणाऱ्या वाहनांवरही कारवाईसध्या सोयाबीन, कापूस हा शेतमाल शेतकऱ्यांनी विक्रीस काढली आहे. ग्रामीण भागातील वाहन चालकांच्या वाहनांना याच हंगामात काम मिळते; पण वाहतूक शाखेच्या दडपशाहीला वाहनचालक कंटाळले आहेत. दररोज शहरात जावे लागत असल्याने चालाण न घेता पैसे उकळले जात असल्याचे वाहन चालक सांगतात. गाडी ओव्हरलोड आहे, वजन करावे लागेल, अडीच हजारांची चालाण घे, अशा स्वरूपाच्या धमक्या देत अधिकाधिक रक्कम उकळण्याचा प्रयत्न केला जात असल्याच्याही तक्रारी आहेत.वाहतूक शाखेचे पोलीस वाहतूक सुरळीत व सुरक्षित व्हावी म्हणून पैसे उकळण्याकरिता, असा संतप्त सवाल ग्रामीण युवक उपस्थित करीत आहेत. यापूर्वी वर्धा कृषभ उत्पन्न बाजार समिती प्रशासनानेही वाहतूक पोलिसांबाबत अधीक्षकांना निवेदन दिले आहे. पॉर्इंट सोडून भलतीकडेच शिपाई फिरताना दिसतात, याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.