शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीच्या आवारातच कापूस उत्पादकांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 23:12 IST

कोणताही शेत माल हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी करणे किंवा खेरदी केलेल्या मालाचा चुकारा अठ्ठेचाळीस तासापेक्षा अधिक वेळ चुकारा थांबविणे कायद्याने गुन्हा आहे.

ठळक मुद्देकायदा तोडणाºया व्यापाºयांची अध्यक्ष सचिवांकडून पाठराखण

फनिंद्र रघाटाटे।लोकमत न्यूज नेटवर्करोहणा : कोणताही शेत माल हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी करणे किंवा खेरदी केलेल्या मालाचा चुकारा अठ्ठेचाळीस तासापेक्षा अधिक वेळ चुकारा थांबविणे कायद्याने गुन्हा आहे. पण सध्या हा कायदा धाब्यावर बसवून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातच शेतकºयांची लूट होत असल्याचे दिसत आहे.कापूस व सोयाबीन खरेदी करताना शेतमालाची प्रत खराब असल्याचे कारण सांगून लुटणाºया व्यापाºयांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अध्यक्ष व संचालकांचे संरक्षण असल्याचे दिसत आहे. त्यांच्या नजरेसमोर खासगी व्यापारी आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकºयांची आर्थिक लुट करीत असल्याची भावना शेतकरी व्यक्त करीत आहे.सोयाबीन प्रति क्विंटल ३०५० व कापसाला प्रति क्विंटल ४३२० रुपये हमीभाव शासनाने जाहीर केला. उत्पादन खर्चाच्या तुलनेत हा भाव शेतकºयांना अजिबात परवडणारा नाही. पण शेतकºयांजवळ कोणताच पर्याय उरला नाही. शेतमाल घरी आल्याने तो कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात विकण्यासाठी आणत आहे. सध्या चांगल्या सोयाबीनला २४०० ते २५०० रुपये व्यापारी देत आहे. यात शेतकरी प्रति क्विंटल ५०० ते ६०० रुपयांनी नागविल्या जात आहे. शासनाची खरेदी सुरू झाल्यावर हेच सोयाबीन व्यापारी जवळच्या शेतकºयांच्या नावावर ३०५० रुपयांनी विक्रीसाठी केंद्रावर नेईल.काही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नुकतीच आवारात खासगी व्यापाºयांनी बाजार समितीच्या मान्यवरांच्या उपस्थितीत कापूस खरेदीचा शुभारंभ केला. या शुभारंभाच्या दिवशी कापसाला व्यापाºयांनी ३७०० ते ४०३१ भाव देवून कापूस उत्पादकांची बोळवण केली. सदर प्रकार बाजार समितीच्या संचालकासमोर घडत आहे. वास्तविक पाहता सध्या समितीत विक्रीसाठी येणारा कापूस सितादहीचा कापूस आहे. तो कापूस प्रतवारीने खराब असूच शकत नाही. फक्त तो परतीच्या मानून पावसाने ओला झाला आहे. शेतकºयांनी तो वाळवून बाजारात आणला तरी पण काही ओलावा कापसात राहतो. हे मान्य केले तर प्रति क्विंटल १ ते २ किलो ओलावा तुट कापून हमीभावाने कापूस खरेदी करणे न्यायोचित असून या प्रकारातून खरेदी अपेक्षित आहे.