लोकमत बाल विकास मंचचा उपक्रमवर्धा : लोकमत बाल विकास मंच, पेस आयआयटी आणि मेडिकल इंस्टिटयुट संयुक्त विद्यमाने लोकमत टॅलेंट सर्च परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल जाहीर करुन बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी करिअर गाईडन्स कार्यशाळा घेण्यात आली. येथील सार्वजनिक वाचनालयात हा कार्यक्रम रविवारी पार पडला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पेस आयआयटीचे अंबुज त्यागी, डॉ. प्रभात तिवारी, हरिओम पुण्याई उपस्थित होेते. या परीक्षेत जिल्ह्यातील विविध शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते. या कार्यक्रमात परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. न्यु इंग्लिश हायस्कूल, लोक विद्यालय, अग्रगामी हायस्कूल, भरत ज्ञान मंदिर, गांधी सिटी पब्लीक स्कूल, जी. बी. एम. हायस्कूल, जिजामाता हायस्कूल, केसरीमल कन्या शाळा, रत्नीबाई विद्यालय, आरटीएम विद्यालय येथील बक्षीसपात्र विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यानंतर करिअरवर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी बोलतांना हरिओम पुण्याई म्हणाले, दहावीनंतर पुढे काय असा प्रश्न प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांना पडतो. आपल्याला केवळ कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखाची माहिती असते. करिअरचे अनेक दालन खुले अललेल्या विद्याशाखा आहे. येथे पुढे जाण्याची संधी आहे. त्यासाठी ध्येय निश्चित करुन कठोर परिश्रम घेण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. यावेळी विद्यार्थी उपस्थित होते. (उपक्रम प्रतिनिधी)
लोकमत टॅलेंट सर्च परीक्षेचे बक्षीस वितरण
By admin | Updated: January 12, 2016 01:54 IST