शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत दीपोत्सव ज्ञानात भर घालणारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2020 05:00 IST

याप्रसंगी देवळीच्या नगराध्यक्ष सुचिता मडावी, न.प. गटनेत्या शोभा तडस, न.प. उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र मदनकर, नगरसेविका कल्पना ढोक, लोकमतचे तालुका प्रतिनिधी हरिदास ढोक यांची उपस्थिती होती.  दीपोत्सव हा लोकमतचा दर्जेदार दिवाळी अंक असून आपण गेल्या दहा वर्षांपासून याचे वाचक आहोत

ठळक मुद्देरामदास तडस : देवळी अन् हिंगणघाटात झाले थाटात विमोचन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशातील सर्वाधिक खपाचा दिवाळीअंक अशी ओळख असलेल्या लोकमतच्या दीपोत्सव जिल्ह्यात थाटात विमोचन करण्यात आले. मागील १५ वर्षांपासून मराठी दिवाळी अंकाच्या मालिकेत विविध उच्चांक गाठलेल्या या दिवाळी अंकाची सर्वत्र प्रतीक्षा असते. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर खा. रामदास तडस यांच्या हस्ते या दिवाळी अंकाचे विमोचन देवळी येथे करण्यात आले. याप्रसंगी देवळीच्या नगराध्यक्ष सुचिता मडावी, न.प. गटनेत्या शोभा तडस, न.प. उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र मदनकर, नगरसेविका कल्पना ढोक, लोकमतचे तालुका प्रतिनिधी हरिदास ढोक यांची उपस्थिती होती.  दीपोत्सव हा लोकमतचा दर्जेदार दिवाळी अंक असून आपण गेल्या दहा वर्षांपासून याचे वाचक आहोत. लोकमतचा दीपोत्सव विविध विषयाचे ज्ञान देणाराच असून यंदाही वाचक या दिवाळी अंकाचे उत्स्फूर्तपणे स्वागत करतील, असा विश्वास खा. तडस यांनी याप्रसंगी व्यक्त केला. हिंगणघाट येथेही दीपोत्सव दिवाळी अंकाचे विमोचन आ. समीर कुणावार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी समुद्रपूरचे नगराध्यक्ष गजानन राऊत व भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते. आ. कुणावार यांनी अंकाची मांडणी, मजकुर व लोकमतच्या संपादकीय कामाची मुक्त कंठाने प्रशंशा केली. या अंकात कोरोनापासून ते चीन पर्यंतच्या विविध प्रश्नांना स्थान देऊन वाचकांचे ज्ञान समृद्ध करण्याचे काम लोकमतने केल्याचेही त्यांनी सांगितले.