शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

लोकसभेत ‘आप’ला नाकारले

By admin | Updated: May 17, 2014 02:13 IST

दिल्ली विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळविणार्‍या आम आदमी पार्टीने लोकसभा निवडणुकीत उडी घेतल्याने राजकीय खलबते सुरू झाली. आपचा उमेदवार सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवाराला धोक्यात आणेल

वर्धा : दिल्ली विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळविणार्‍या आम आदमी पार्टीने लोकसभा निवडणुकीत उडी घेतल्याने राजकीय खलबते सुरू झाली. आपचा उमेदवार सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवाराला धोक्यात आणेल अशी चर्चा राजकीय तज्ज्ञ करीत होते. मात्र जिल्ह्यातच नव्हे राज्यातही आपला अपयश आल्याचे समोर येत आहे. वर्धा जिल्ह्यात आपच्या उमेदवाराला मिळालेल्या मतांमुळे या पक्षाची ओळखही कायम करण्यात अपयश आले. वर्धेकर एवढय़ावरच थांबले नाही तर आपच्या उमेदवाराची जमानतही जप्त करीत त्याला नाकारले.दिल्लीतील आलेल्या यशामुळे पक्षाने लोकसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला. यानुसार त्यांनी उमेदवारही उभे केले. आपचाच उमेदवार वर्धा लोकसभा निवडणुकीत तिसर्‍या क्रमांकावर राहील, असे सर्वांना वाटत होते. मात्र हा उमेदवार अपक्षाच्या तुलनेतही मागे पडला.आपची उमेदवारी देताना राज्यात नागरिकांतून मते मागविण्यात आली होती. त्यानुसार उमेदवारी देण्यात येणार असल्याचे आपच्यावतीने सांगण्यात आले होते. आपच्या सदस्यांनी जिल्ह्यात केलेल्या सर्वेक्षणातून वर्धेतून आर्वी येथील मो. अलीम पटेल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यांचा प्रचारही सुरू झाला होता. हातात झाडू घेवून भ्रष्ट्राचार मुक्त सत्ता देण्याचा मानस आपच्यावतीने व्यक्त करण्यात आला. रस्त्यातून हातात झाडू घेत भेटणार्‍या प्रत्येक मतदाराच्या डोक्यात टोपी घालत मत मागणार्‍या आपच्या अलिम पटेल यांना वर्धेकर मतदारांनी साफ नाकारले.अलीम पटेल यांना उमेदवारी देताना मुस्लिम समाजाची गठ्ठा मते त्यांना मिळतील असे राजकीय वेिषकांकडून सांगण्यात येत होते. मात्र येथे तसे झाले नाही. स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार देवून उत्तम शासन देण्याचा आपचा प्रयत्न असल्याचे पक्षाचे संस्थापक अरविंद केजरीवाल राज्यात प्रचारादरम्यान सांगत होते. त्यांचे हे प्रयत्न अंमलात आणण्याकरिता रिंगणात असलेल्या आपच्या उमेदवारांना वर्धेतच नाही तर राज्यातही नाकारण्यात आले. त्यांचे बोटावर मोजण्याइतपतच उमेदवार निवडून आले.आपचा उमेदवार जी मते घेईल त्याचा लाभ काँग्रेसला होईल असे गणित मांडण्यात येत होते. मात्र निकालाच्या दिवशी मांडण्यात आलेली गणिते कुठे उलटली हे कुणालाही समजले नाही. वर्धेत आपचा उमेदवार उभा होता व त्याने घेतलेल्या मताचा दुसर्‍या पक्षाच्या वा इतर कुठल्याही उमेदवारावर त्याचा कोणताही परिणाम झाला नसल्याने हे त्याने घेतलेल्या मतांवरून समोर आले आहे. यामुळे या निवडणुकीत आपचा उमेदवार पक्षाची काही तरी छाप सोडेल असे सार्‍यांना वाटले होते मात्र तसे झाले नाही. उलट पक्षाची ओळख निर्माण करण्यात अपयशी ठरले.(प्रतिनिधी)