शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

लोहार समाजाच्या समस्या लोकसभेत मांडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 21:06 IST

लोहार समाजाच्या सर्वांगीन विकासासाठी आपण सोबत असून विमुक्त भटक्या जमातीसाठी असलेला दादा इदाते आयोग लागु करण्यासाठी संसदेत आवाज उठवून या समाजाला न्याय देण्यास सहकार्य करू, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले. पिपरी (मेघे) येथील बाबाराव मेघे यांच्या मालकीचे मैदानावर वैदर्भीय गाडीलोहार, तत्सम जाती महासंघ, नागपूर व जिल्ह्यातील लोहार समाजाचे वतीने ८ वे राज्यस्तरीय महाअधिवेशन पार पडले. यावेळी ते बोलत होते.

ठळक मुद्देरामदास तडस : पिपरी येथे राज्यस्तरीय आठवे महाअधिवेशन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लोहार समाजाच्या सर्वांगीन विकासासाठी आपण सोबत असून विमुक्त भटक्या जमातीसाठी असलेला दादा इदाते आयोग लागु करण्यासाठी संसदेत आवाज उठवून या समाजाला न्याय देण्यास सहकार्य करू, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले. पिपरी (मेघे) येथील बाबाराव मेघे यांच्या मालकीचे मैदानावर वैदर्भीय गाडीलोहार, तत्सम जाती महासंघ, नागपूर व जिल्ह्यातील लोहार समाजाचे वतीने ८ वे राज्यस्तरीय महाअधिवेशन पार पडले. यावेळी ते बोलत होते.महामेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे अध्यक्ष प्रा. चरणदास बावणे होते. महाअधिवेशनाचे उद्घाटन खा. रामदास तडस यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाले. अधिवेशनाला प्रमुख पाहुणे माजी आमदार राजु तिमांडे, राष्टÑीय विमुक्त भटक्या जमाती आयोगाचे माजी अध्यक्ष दादा इदाते, माजी न्यायाधिश द.रा. सम्राट, नगराध्यक्ष अतुल तराळे, ग्रा.पं. सदस्य डॉ. विद्या कळसाईत, सुधीर पांगुळ, सुरेश दिशागज, लोहार समाजाचे अध्यक्ष सदाशिव हिवलेकर, महासंघाचे माजी अध्यक्ष, रा.दा. सुर्यवंशी, संघर्ष वाहिनीचे दिनानाथ वाघमारे, माजी जि.प. सभापती मिलिंद भेंडे, स्वागताध्यक्ष दिनकर धानोरकर, आनंद अंगलवार, कोषाध्यक्ष एम.बी. पडघन, राजेंद्र कळसाईत, प्रल्हाद गोलाईत, राजु बढिये हजर होते. याप्रसंगी दादा इदाते यांनी ‘इदाते’ आयोगाच्या शिफारशीबाबत सविस्तर मार्गदर्शन करीत हा आयोग लागू करण्यासाठी लोहार समाजासह सर्व दुर भटक्या विमुक्त जमातींनी एकसंघपणे शासन प्रशासनावर दबाव आणून घटनात्मक अधिकार मिळवण्यासाठी संघटीत होण्याचे आवाहन केले.अधिवेशन समितीचे अध्यक्ष एस.एन. शेंडे यांनी अधिवेशनामागची भूमिका विषद केली. एस.एफ. मांडवकर यांनी संपादीत केलेल्या स्मरणिकेचे विमोचन करण्यात आले. तर गुणवंत विद्यार्थी सत्कार व उपवरवधू मेळाव्याचे प्रास्ताविक सुरेश मांडवगडे यांनी केल्यानंतर उपस्थित वर-वधूनी आपल्या भावी आयुष्यातील जोडीदाराबाबत अपेक्षा व्यक्त करून आपण लग्नास सज्ज असल्याचे परिचयातून दर्शविले. यानंतर उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तसेच राज्यातुन आलेल्या कलावंतांनी एकाहून एक कला सादर करीत सरस नृत्य तथा कला सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे संचालन सुरेश चंदनकर, रमेश चंदनकर यांनी तर समारोप शामराव काळभांडे व आभार अनिल मेश्राम यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी समीर धानोरकर, किशोर छापेकर, आशिष घुग्घुसकर, प्रभाकर कांबळे, रमेश चंदनकर, पंकज बावणे, देवराव तांदुळकर, मोहन धानोरकर, नरेंद्र सोनटक्के, किशोर हंसकार, निलेश धानोरकर, दत्ता चौधरी, सुभाष मोहनकर, चंदु शेलवट, गणेश वाघ, अंकुश बावणे, शिला धानोरकर, नंदिनी छापेकर, वैशाली सावरकर, आर.जी. वाघमारे, मेसेकर आदिंनी प्रयत्न केले.