शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer: छगन भुजबळांच्या मनात चाललंय काय?; 'या' ४ घटनांमुळे निर्माण झालं संशयाचं वातावरण
2
'इंडिया'ची सत्ता आली तर पंतप्रधान कोण होणार? काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांनी दिलं असं उत्तर  
3
धक्कादायक! गटारात स्त्री जातीचं अर्भक सापडलं; साताऱ्यातील घटनेनं खळबळ 
4
२०० पेक्षा अधिक रॅली, रोड शो, सभा, ८० मुलाखती..; देशात PM नरेंद्र मोदींचा तगडा प्रचार
5
"महाराष्ट्रासह या 4 राज्यात काँग्रेस जोरदार मुसंडी मारणार", जयराम रमेश यांचा दावा
6
काँग्रेस नेते राहुल गांधींना पुणे न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?
7
ब्लॉक सुरु होण्यापूर्वीच लोकलला १५ ते ३० मिनिटांचा लेटमार्क; आज १६१ लोकल फेऱ्या रद्द
8
मृणाल दुसानीसच्या चाहत्यांसाठी खुशखबर! अभिनेत्री लवकरच करणार कलाविश्वात कमबॅक; म्हणाली...
9
रिलायन्सचे पेटीएम, फोनपेला मोठं आव्हान! JioFinance ॲप लाँच; युजर्सना मिळणार 'हे' फायदे
10
निवडणुकीत काँग्रेसवाले लाखो रुपये घेऊन आले, परंतु...; नरसय्या आडम यांचं खळबळजनक विधान
11
"मी भारताकडून खेळणार म्हणजे खेळणारच, बाकी मला...", रियान परागचं विधान
12
६ महिन्यांचे काम अडीच दिवसांत! मध्य रेल्वेच्या 'स्पेशल ब्लॉक'नंतर प्रवाशांना 'स्पेशल' ट्रिटमेंट
13
" ‘इंडिया’चा विजय झाल्यास ४८ तासांत होणार नव्या पंतप्रधानांची घोषणा, असा असेल निवडीचा फॉर्म्युला’’, जयराम रमेश यांचा दावा
14
जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरूंची बस दरीत कोसळली, २१ जणांचा मृत्यू
15
Fact Check : सट्टा बाजाराच्या नावाने व्हायरल होणारी 'लोकसभेची भविष्यवाणी' FAKE; जाणून घ्या सत्य
16
धंगेकरांसह सुषमा अंधारेही अडचणीत येणार?; मंत्री शंभूराज देसाईंनी दिला आक्रमक इशारा
17
सलमान, अजय अन् अक्षयनेही नाकारलेला सिनेमा पडला पदरात! अभिनेत्याचं उजळलं नशीब
18
"तेव्हा तुमचे डोळे कुठे गेले होते?’’, इस्राइलचा हमास समर्थकांना सवाल
19
"प्रचार करताना तर काहीच त्रास झाला नाही, मग ..."; केजरीवालांच्या तब्येत ठीक नसल्याच्या दाव्यावर EDचे प्रत्युत्तर
20
व्लादिमीर पुतिन यांना उत्तराधिकारी मिळाला? या मोठ्या पदावर केली नियुक्ती, जाणून घ्या कोण आहेत?

Lok Sabha Election 2019; भाजप-सेना युतीच्या विजयासाठी प्रयत्न करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2019 11:47 PM

हिंगणघाट-समुद्रपूर, सिंदी रेल्वे या मतदारसंघातील हजारो शिवसैनिक रामदास तडस यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे माजी राज्यमंत्री, शिवसेनेचे उपनेते अशोक शिंदे यांनी सांगितले.

ठळक मुद्देअशोक शिंदे : हिंगणघाट येथे सेनेचा मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : हिंगणघाट-समुद्रपूर, सिंदी रेल्वे या मतदारसंघातील हजारो शिवसैनिक रामदास तडस यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे माजी राज्यमंत्री, शिवसेनेचे उपनेते अशोक शिंदे यांनी सांगितले.भाजपा-शिवसेना व रिपाइंचे अधिकृत उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ हिंगणघाट येथील कटारिया भवनात शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.मेळाव्याला उमेदवार रामदास तडस, महिला शिवसैनिक सुधा शिंदे, जिल्हाप्रमुख राजेश सराफ, राजू खुपसरे, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष अभिनंदन मुणोत, मुन्ना त्रिवेदी, मिलिंद भेंडे आदी उपस्थित होते.शिंदे म्हणाले, मागील काही दिवसांपासून शिवसेनेचा भारतीय जनता पार्टीसोबत ताळमेळ बसत नसल्याची बाब पुढे आली होती. यात प्रामुख्याने अशोक शिंदे यांचा या लोकसभा प्रचार मोहिमेत कुठेही मोठा सहभाग दिसून येत नाही, असेदेखील बोलले जात होते. मात्र, या मेळाव्याने या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली आले आहेत.लोकसभेची निवडणूक ही आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. यासाठी बूथ कार्यकत्यार्पासून पदाधिकारी व शिवसैनिक तसेच युवा सैनिक यांनी एकत्रित येऊन ११ तारखेपर्यंत एका-एका मतासाठी कसोशीने प्रयत्न करावे, उमेदवार तडस यांना निवडून आणण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत पूर्ण प्रयत्न करीत राहावे, असे सांगितले. खासदार तडस यांनी यावेळी शिवसैनिकांच्या अनेक रखडलेल्या कामांना सोडविण्याचा प्रयत्न मागील पाच वर्षांत केला असल्याचे सांगितले.यापुढेही शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या सेवेत राहील, असे आश्वासन दिले. सभेला चंदू पंडित, रवी लडी, प्रमोद भटे, रवी चव्हाण, निखिल वाघ, किशोर भांदक्कर, जयश्री चौके, अमोल गायकवाड, भारत चौधरी, गणेश इखार, किशोर बोकडे, मंदाबाई चौधरी, करुणा वाटकर, संगीता कडू, नगरसेवक श्रीधर कोटकर यांच्यासह हिंगणघाट व समुद्रपूर परिसरातील शिवसनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.शहागडकर लागले प्रचारातशिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळा शहागडकर देवळी व आर्वी विधानसभा मतदार संघात कामाला लागले आहे. शिवसेनेचे पदाधिकारी यांना सोबत घेवून ग्रामीण भागात प्रचारसभा घेण्यावर त्यांचा जोर आहे. याशिवाय गावागावांत मतदारांशी संपर्क करून त्यांना युतीला मतदान करण्याचे आवाहन ते करीत आहेत. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकwardha-pcवर्धाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019