शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; नेमबाज व कुस्तीपटूत रंगणार वर्धेचा लोकसभा आखाडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 21:12 IST

वर्धा लोकसभा मतदार संघात दोन खेळांडूमध्ये निवडणूकीचा थेट सामना रंगत आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अ‍ॅड.चारूलता टोकस व भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार विद्यमान खासदार रामदास तडस असे हे दोन खेळाडू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा लोकसभा मतदार संघात दोन खेळांडूमध्ये निवडणूकीचा थेट सामना रंगत आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अ‍ॅड.चारूलता टोकस व भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार विद्यमान खासदार रामदास तडस असे हे दोन खेळाडू आहे. रामदास तडस हे प्रख्यात कुस्तीपटू असून १९६८ मध्ये तडस यांनी नागपूर केसरीचा पुरस्कार पटकाविला. १९७६, १९७८, १९८०, तसेच १९८२ नंतर सलग ४ वेळा त्यांनी कुस्तीचा विदर्भ केसरी पुरस्कार पटकाविला आहे. ते मागील १८ वर्षापासुन राज्य कुस्तीगीर परिषदेचे सल्लागार आहेत. तर काँग्रेसच्या उमेदवार अ‍ॅड. चारूलता टोकस या रायफलमध्ये राष्ट्रीय नेमबाज आहेत. १९८५ ते १९९१ या कालावधीत त्यांनी विविध राष्ट्रीय स्पर्धेत नेमबाजी केली. आशियाई क्रिडा स्पर्धेत त्यांना रौप्य पदक मिळाले आहे. १९९१ मध्ये महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रिडा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. अशा या दोन क्रिडा पटूंमध्ये सध्या वर्धा लोकसभा मतदार संघात चुरशीची लढत होत आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पहेलवान असलेल्या रामदास तडस यांनी काँग्रेसचा पराभव केला होता. आता यावेळी दोन क्रिडापटूमधील लढतीत कोण बाजी मारतो. हे पाहणे महत्वाचे राहणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकwardha-pcवर्धाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019