शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; कमी मतदान होणाऱ्या केंद्रांवर जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 22:38 IST

लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. त्याकरिता २१०४ च्या लोकसभा निवडणुकीत ज्या मतदान केंद्रावर ४० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले असेल, त्या मतदान केंद्र परिसरात व्यापक जनजागृती करण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देटक्केवारी वाढविण्यावर भर : जिल्हाधिकाऱ्यांची पत्रपरिषदेत माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. त्याकरिता २१०४ च्या लोकसभा निवडणुकीत ज्या मतदान केंद्रावर ४० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले असेल, त्या मतदान केंद्र परिसरात व्यापक जनजागृती करण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी पत्रपरिषदेत दिली.लोकसभा निवडणुकीकरिता राष्ट्रीय पक्षांसह नोंदणीकृ त राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त पक्ष व अपक्ष अशा एकूण १६ उमेदवारांनी २३ नामांकन अर्ज दाखल केले होते. ते सर्व नामांकन अर्ज वैध ठरविले असून गुरुवारी दोन अपक्ष उमेदवारांनी नामांकन अर्ज मागे घेतले आहे. त्यामुळे आता १४ उमेदवार लोकसभेच्या निवडणूक रिंगणात आहे. या सर्व उमेदवारांना निवडणूक चिन्ह दिले असून ती यादी मान्यतेकरिता निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्याकरिता प्रशासन प्रयत्नरत असून मतदान केंद्रावर मतदारांची गैरसोय होणार नाही, याचीही काळजी घेतली जाणार आहे. असेही जिल्हाधिकारी भिमनवार यांनी सांगितले.या पत्रकार परिषदेला पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर जिल्हाधिकारी संजय दैने, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) प्रवीण महिरे व जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे यांची उपस्थिती होती.निवडणुकीकरिता प्रशासन सज्जनिवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्याकरिता पुरेशा कर्मचारी वर्गाची नियुक्ती केली आहे. या कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण पूर्ण झाले असून मशीन हाताळण्याचे दुसरे प्रशिक्षण पुढच्या आठवड्यात दिले जाणार आहे. तसेच निवडणूक कार्यात असलेले व इतरही शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना आणि पोलिसांनी मतदानाचा अधिकार बजवावा याकरिताही नियोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.सोबतच पोलिसांचाही तगडा बंदोबस्त लावण्यात येणार आहे. याकरिता २ डीवायएसपी, ६ पोलीस निरीक्षक, ७ पोलीस उपनिरिक्षक व सहाय्यक पोलीस निरिक्षक, ५५० पोलीस कर्मचारी, ७०० गृहरक्षक दलाचे जवान तसेच राज्य राखीव दलाचे तीन तुकड्या तैनात राहणार आहेत. एका तुकडीत ३० जवानांचा समावेश असेल, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी दिली.मतदानापूर्वीच झाली ईश्वरचिठ्ठीएरव्ही मतदान झाल्यानंतर मतमोजणीच्या वेळी साधारणत: ईश्वरचिठ्ठी करून उमेदवाराच्या भाग्याचा फैसला केला जातो. परंतुल, आज दोन उमेदवारांनी एकाच निवडणूक चिन्हाची मागणी केल्याने निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ईश्वरचिठ्ठी करण्यात आली. राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांना पक्षाचे अधिकृत चिन्ह दिल्यानंतर नोंदणीकृ त राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त पक्षांसह अपक्ष उमेदवारांना चिन्हाची निवड करायची होती. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार धनराज वंजारी व आंबेडकरिस्ट रिपब्लिकन पार्टीचे प्रवीण गाढवे या दोघांनीही एकाच चिन्हाची मागणी केली होती. त्यामुळे झालेल्या ईश्वरचिठ्ठीत गाढवे यांना त्यांच्या पसंतीचे चिन्ह देण्यात आले तर वंजारी यांना दुसरे चिन्ह दिले.