शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; पंतप्रधान शेतकरी व शेतीबद्दल बोलत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 21:29 IST

देशाचा पंतप्रधान शेतकरी, शेती याविषयी काहीही बोलत नाही. आम्ही गांधींच्या भूमितून गांधींचे विचार पुढे नेण्यासाठी काम करणार आहो, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कॉँग्रेस शेतकऱ्यांचा लढा पुढे नेण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यामुळेच कॉँग्रेससोबत स्वाभीमान शेतकरी संघटना, रिपाई आदीसारखे पक्ष सोबत आले आहे. देशाचा पंतप्रधान शेतकरी, शेती याविषयी काहीही बोलत नाही. आम्ही गांधींच्या भूमितून गांधींचे विचार पुढे नेण्यासाठी काम करणार आहो, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले. कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.या सभेला कॉँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष खा. राहुल गांधी उपस्थित होते. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टिका केली. पंतप्रधानांना शेतकरी व गरीबांशी गळा मिळविताना कुणीही पाहिले नाही. ते अंबानी, अदानी यांच्याशीच गळा मिळवितात. ते श्रीमंताचे चौकीदार आहे, असा उल्लेखही त्यांनी केला. या सभेला स्वाभीमान शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी, रिपाई (ग.) गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजेंद्र गवई, कॉँग्रेसच्या मागासवर्गीय सेलचे प्रदेशाध्यक्ष राजू वाघमारे यांनीही मार्गदर्शन केले. त्यांनी कॉँग्रेसने संविधानाचे रंक्षण करण्याचे काम केल्याचे सांगितले. तब्बल ३३ मिनीटे राहुल गांधी यांनी सभेला मार्गदर्शन केले. सभेचे प्रास्ताविक धामणगाव (रेल्वे) चे आमदार विरेंद्र जगताप तर आभार जिल्हा कॉँग्रेसचे अध्यक्ष मनोज चांदुरकर यांनी मानले.

उमेदवाराने नाही साधला मतदाराशी संवाद लोकसभा मतदार संघात कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. राहुल गांधी यांची जाहीर सभा शुक्रवारी पार पडली. या जाहीर सभेला उमेदवार अ‍ॅड. चारूलता टोकस उपस्थित होत्या. परंतु त्यांनी राहुल गांधी येण्यापूर्वी किंवा राहुल गांधी आल्यानंतर सभेला आलेल्या मतदाराशी संवाद साधला नाही. त्यामुळे मतदारांमध्ये याची चर्चा दिसून आली.

अन् भाषणादरम्यान सुरक्षा रक्षकाने दिली चिठ्ठी राहूल गांधी यांचे हेलिकॉप्टम ५.०५ वाजता वर्धेच्या आकाशात झळकले. हे हेलिकॉप्टर ५.०७ वाजता हेलिपॅडवर लॅन्ड झाल्यानंतर राहूल गांधी हे सभा स्थळ गाठून ५.१४ वाजता व्यासपीठावर चढले. राहूल गांधी हे भाषण देत आताना एका सुरक्षा रक्षकाने ५.५४ वाजता एक चिठ्ठी त्यांना दिली. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांनी राहूल गांधी यांनी भाषण आटोपले, हे विशेष.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकwardha-pcवर्धाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019