शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; घराणेशाहीला संपवून देशाचा विकास साधणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 21:35 IST

प्रधानमंत्र्यांचा मुलगा प्रधानमंत्री, मंत्र्यांचा मुलगा मंत्री, आमदारांचा मुलगा आमदार, खासदारांचा मुलगा खासदार अशी घराणेशाहीची साखळी तोडून जातीयवाद सांप्रदायिकता संपवून या देशाचा विकास भारतीय जनता पार्टी साधणार, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या अत्महत्या थांबविण्यासाठी आम्ही वचनबद्ध

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : छत्रपती शिवराय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा या महापुरुषांनी जातीपातीचा विचार न करता सामान्य माणसाला समृद्धेचा व संपन्नतेचा मार्ग दिला. प्रधानमंत्र्यांचा मुलगा प्रधानमंत्री, मंत्र्यांचा मुलगा मंत्री, आमदारांचा मुलगा आमदार, खासदारांचा मुलगा खासदार अशी घराणेशाहीची साखळी तोडून जातीयवाद सांप्रदायिकता संपवून या देशाचा विकास भारतीय जनता पार्टी साधणार, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.भाजपा-सेना महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचार सभेत ते मार्गदर्शन करताना बोलत होते. गरीबी, शेतकऱ्याला कोणतीही जात-पात नसते. हे सांगून शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, सातबारा कोरा व इतर सर्व प्रकारची शासकीय मदत देवून राज्यांतील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकारने देशातील १ लाख ६० हजार गावांना रस्त्यांनी जोडून सामान्य माणसाचा मार्ग सुकर केला. तर मेट्रो रेल्वे मार्गातून सामान्य माणसाची पावले गतीमान केली. देशातील संविधान तोडण्याची भाषा करणारी मंडळी दुसरी तिसरी कोणी नसून कॉँग्रेसच आहे. याच सरकारने ८० वेळा संविधानाचा बदल करण्याचा प्रयत्न केला, असा घणाघाती आरोप याप्रसंगी गडकरी यांनी केला. गेल्या पाच वर्षातील वर्धा जिल्ह्याच्या विकासाचे खरे श्रेय भाजपा खा. रामदास तडस यांना जाते. विदर्भातील शेतकऱ्यांसाठी विकासाचे विविध प्रकल्प ३ वर्षात बडनेरा-नागपूर मेट्रो, पुलगाव-आर्वी शंकुतला ट्रेनचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर, वर्धा जिल्ह्यात मेट्रो ट्रेन निर्मिती कारखाना व इतर प्रकल्प राबवून राज्यातील रस्ते विकसीत करून यासाठी आमचे शासन कटिबद्ध राहणार असल्याचे यावेळी गडकरी यांनी सांगितले. स्थानिक सर्कस ग्राऊंडवर दुपारी ३ वाजता पार पडलेल्या प्रचार सभेत बोलताना शासनाच्या विकासाचा आढावा घेत रामदास तडस म्हणजे हात दाखवा एस.टी. थांबवा अस व्यक्तीमत्व असल्याची कोपरखळीही त्यांनी केली. याप्रसंगी व्यासपीठावर खा. डॉ. विकास महात्मे, माजी खासदार सुरेश वाघमारे, विजय मुडे, सेनेचे माजी खासदार अनंत गुढे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, मिलिंद भेंडे, नगराध्यक्ष शितल गाते, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाळु शहागडकर, अ‍ॅड. माथने, भाजपा शहराध्यक्ष मंगेश झाडे, विजय आगलावे, संजय गाते, वैशाली येरावार, प्रविण सावरकर आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकwardha-pcवर्धाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019