शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; काँग्रेसचा जाहीरनामा ‘मेड इन पाकिस्तान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 21:17 IST

आपल्याला सामान्य माणूस खासदार म्हणून पाहिजे. लालमातीची कुस्ती जिंकली, त्या माणसाला लोकसभेची कुस्तीसुद्धा जिंकून घ्यायची आहे, असे आवाहन राज्याचे अर्थमंत्री, वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

ठळक मुद्दे सिंदी (रेल्वे) येथील सभेत टीका

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : काँग्रेसचा जाहीरनामा हा मेड इन पाकिस्तान आहे, तिरंगा ध्वज जाळला तरी देश द्रोहाचा गुन्हा दाखल होणार नाही. अमेठीपेक्षा वर्धा जिल्ह्याचा विकास झाला. सामान्य माणसाला कामासाठी खासदारांना भेटायला जायचे असल्यास रामदासजी ४० कि. मी. वर भेटतील, तर विरोधी पक्षाचे उमेदवार चारूलता टोकस यांना भेटायला १०९२ कि. मी. गुडगावला जावे लागेल. आपल्याला सामान्य माणूस खासदार म्हणून पाहिजे. लालमातीची कुस्ती जिंकली, त्या माणसाला लोकसभेची कुस्तीसुद्धा जिंकून घ्यायची आहे, असे आवाहन राज्याचे अर्थमंत्री, वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार विद्यमान खासदार रामदास तडस यांच्या निवडणूक प्रचारार्थ सिंदी रेल्वे येथील झेंडा चौकात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी उमेदवार रामदास तडस, आमदार समीर कुणावार, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश सराफ, नगराध्यक्ष संगीता शेंडे, जि. प सदस्य विजय आगलावे, किशोर शेंडे, विनोद लाखे, किशोर दिघे, योगेश फुसे, किशोर भांदककर, सुधाकर घवघवे, पळसगावचे सरपंच धीरज लेंडे इत्यादी उपस्थित होते.मुनगंटीवार म्हणाले, गुढीपाडवा म्हणजे शेतकऱ्यांची मांडवस. मांडवसीच्या दिवशी जो माणूस चांगले काम करतो, त्याला पुन्हा कामावर ठेवल्या जाते, जो काम करीत नाही, त्याला कामावरून काढल्या जाते. रामदास तडस यांनी पाच वर्षांत विकासाची चांगली कामे केली आहे. त्यांना एक्स्टेंशन द्यायचं, ११ तारखेला मत देऊन त्यांना पुन्हा कामावर ठेवायचे, अशी साद त्यांनी मतदारांना घातली.या प्रसंगी उमेदवार रामदास तडस यांनी आपण पाच वर्षात केलेल्या कामाचा पाढा मतदारांपुढे वाचला. ५५ वर्षांत झाले नाही ते काम ५ वर्षात करून दाखविले. सिंदीमध्ये ड्रायपोर्ट, उड्डाणपूल, आदी अनेक विकासकामे या मतदारसंघात केली. वर्धा जिल्ह्यात राव घराण्याने ४८ वर्षे राज्य केले. परंतु विकास मात्र कुठे दिसलाच नाही. काँग्रेसला उमेदवारसुद्धा मिळणे मुश्किल होते, काँग्रेसने गरिबी हटावचा नारा दिला, गरीबी हटली, मात्र काँग्रेस नेत्यांची, सामान्य माणसाची नाही. वर्ध्याचा विकास पुन्हा जोमात करण्यासाठी पुन्हा एकदा संधी द्यावी, असे आवाहन तडस यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन ओमप्रकाश राठी यांनी केले. पंकज पराते यांनी आभार मानले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकwardha-pcवर्धाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019