शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; स्थिर सरकारसाठी भाजपच आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 21:07 IST

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात स्थिर सरकार आणण्यासाठी सर्वांनी भारतीय जनता पक्षाला सहकार्य करावे, असे आवाहन माजी आमदार सागर मेघे यांनी केले.

ठळक मुद्देसागर मेघे यांचे आवाहनव्यापाऱ्यांशी संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात स्थिर सरकार आणण्यासाठी सर्वांनी भारतीय जनता पक्षाला सहकार्य करावे, असे आवाहन माजी आमदार सागर मेघे यांनी केले. वर्धा येथे आयोजित व्यापाऱ्यांसोबत संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला राज्याचे वित्त व नियोजनमंत्री सुधिर मुनगंटीवार, विधान परिषदेचे माजी आमदार सागर मेघे, खासदार व भाजप उमेदवार डॉ. पंकज भोयर, लोकसभा प्रमुख सुधीर दिवे, व्यापारी संघाचे अध्यक्ष अरूण काशीकर आदी उपस्थित होते.याप्रसंगी मार्गदर्शन करताना सागर मेघे म्हणाले की, रामदास तडस यांच्याशी मेघे कुटूंबाचे सदैव कौटूंबीक संबंध राहिलेत व ते पुढेही कायम राहतील. त्यांना निवडणूक आणण्यासाठी व देशात स्थिर सरकार आणण्यासाठी आम्ही सारे प्रयत्नशील आहोत. या प्रयत्नांना आपणही सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, सुरुवातीला प्रक्रिया नवीन असल्याने व्यापारी वर्गाला व कर सल्लागारांना त्रास सहन करावा लागला. परंतु व्यापारी वर्गाने समाजात व भारतीय अर्थव्यवस्थेत नेहमीच मोलाचे योगदान देणाºया जीएसटीत महत्वपूर्ण सूचना दिल्या. याचा मला आनंद आहे. या सूचनांच्या आधारे जीएसटी कौन्सीलने एक मताने या सूचनांचा स्विकार करून कर प्रणाली सुलभ केली. यात व्यापाऱ्यांचे योगदान अतिशय महत्वाचे आहे. हा देश पुढे नेण्यासाठी व्यापारी बंधूंनी भारतीय जनता पक्ष, शिवसेना युतीला सहकार्य करावे, असे प्रतिपादन त्यांनी केले. या कार्यक्रमाचे संचालन राजकुमार जाजू, प्रास्ताविक अरूण काशिकर, आभार श्रीनिवास मोहता यांनी मानले. या बैठकीला भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी महाराष्ट्र चे सचिव जगदीश टावरी, शालिग्राम टीबड़ीवाल, संजय गोयनका, इद्रीस मेमन, दामोदर दरक, दिलीप कठाने, विशाल धीरन, किशोरभाऊ सुरकार, देवीदास करंडे, पंकज सराफ, नटवर रिणवा, राजकुमार जाजू, पांडु गायकवाड़, अशोक कृपलानी,ददनसिंग ठाकुर, गणेश देवानी, राजेश आहूजा, प्रवीण जैन, हरीश व्यास, श्रीकांत वाटकर, राकेश मंशानी, दीपन मिश्रा, सुरेश पंजवाणी, ढोलू आहूजा, प्रताप वाटवानी, सूरज रामानी, शेरा भाटिया तसेच बहुसंख्येने व्यापारी वर्ग उपस्थित होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकwardha-pcवर्धाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019