शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; अग्रवाल सर्वाधिक श्रीमंत उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 23:37 IST

वर्धा लोकसभा मतदार संघातून बहुजन समाज पक्षाच्यावतीने निवडणूक रिंगणात असलेले शैलेशकुमार प्रेमकुमार अग्रवाल हे मतदार संघातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार आहेत. अग्रवाल यांच्याकडे चल-अचल अशी ११ कोटींच्यावर संपत्ती असल्याची माहिती त्यांनी निवडणूक शपथपत्रात दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा लोकसभा मतदार संघातून बहुजन समाज पक्षाच्यावतीने निवडणूक रिंगणात असलेले शैलेशकुमार प्रेमकुमार अग्रवाल हे मतदार संघातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार आहेत. अग्रवाल यांच्याकडे चल-अचल अशी ११ कोटींच्यावर संपत्ती असल्याची माहिती त्यांनी निवडणूक शपथपत्रात दिली आहे. तसेच अग्रवाल यांच्यावर आर्वी पोलीस ठाण्यात एका गुन्ह्याची नोंद आहे.आर्वीच्या वलीसाहेब वॉर्डातील रहिवासी असलेले अग्रवाल यांच्याकडे ५ लाख रूपये रोख स्वरूपात असून त्यांच्या नावे एसबीआय वर्धा येथे ३८ लाख १३ हजार, एसबीआय आर्वी येथे ६५ लाख, कार्पोेरेशन बॅँक नागपूर येथे ३० लाख, पंजाब नॅशनल बॅँक सावंगी येथे २० लाख आणि एसबीआय नागपूर येथे ५५ लाख रूपयाचे एफबीआर काढण्यात आले आहे. त्यांच्या पत्नीजवळ २ लाख रूपये रोख असून त्यांच्या नावे सुद्धा पंजाब नॅशनल बॅँक सावंगी येथे ५ लाख, ३ लाख व ४ लाख ११ हजार रूपयाचे एफबीआर काढण्यात आले आहे. याशिवाय अग्रवाल यांनी एसबीआय लाईफमध्ये १० लाख व त्यांच्या पत्नीने सुद्धा १० लाखांची गुंतवणूक केली आहे. अग्रवाल यांची एलआयसीमध्ये १० लाख व त्यांच्या पत्नीची पीपीएफ मध्ये ८ लाख व एलआयसीमध्ये २९ लाख रूपयाची गुंतवणूक आहे. अग्रवाल यांच्याकडे १२७ ग्रॅम सोने असून त्याची किंमत ३ लाख ८१ हजार आहे.याशिवाय त्यांच्या पत्नीकडे ५६० ग्रॅम सोने आहे. त्याची किंमत १६ लाख ८० हजार रूपये आहे. एकूण वाहने व ज्वेलरी असे मिळून अग्रवाल यांच्याजवळ ३ कोटी ५७ लाख ५८ हजार रूपयाची चल स्वरूपाची मालमत्ता आहे तर त्यांच्या पत्नीकडे ८४ लाख ९१ हजार रूपयाची संपत्ती आहे. याशिवाय त्यांच्याकडे इसाकपूर शिवारात शेती असून पत्नीच्याही नावे १.११ हेक्टर आर जमीन आहे. याशिवाय वर्धा, सालोड (नेरी), देवळी, भादोड येथे जमीन असल्याचे त्यांनी शपथपत्रात नमुद केले आहे. वर्धा शहरात आर्वी मार्गावर जमीन आहे. या सर्व संपत्तीचे बाजारमूल्य ३ करोड रूपये असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. याशिवाय अग्रवाल यांच्यावर ५ लाख ५३ हजार ३८० रूपयाचे कर्ज आहे तर त्यांच्या पत्नीवर १५ लाख ४५ हजारांचे कर्ज आहे. अग्रवाल हे निरमा विद्यापीठातून २००८ मध्ये एमबीए झालेले आहेत.अग्रवाल यांच्याकडे महागड्या गाडीसह तीन वाहनेअग्रवाल यांच्याकडे आॅडी हे चारचाकी वाहन असून ४२ लाख ५० हजार रूपये दाखविण्यात आली आहे. याशिवाय ५ लाख १० हजार रूपये किंमतीची व १ रुग्णवाहिका असून तिची किंमत ३ लाख ४ हजार रूपये आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक