शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त गावकऱ्यांनी ठोकले शाळेला कुलूप

By admin | Updated: September 4, 2016 00:31 IST

तालुक्यातील धोची येथील शाळेला कामयस्वरूपी शिक्षकाची मागणी गावकऱ्यांनी केली होती.

पाच वर्गांकरिता एकच शिक्षक : दोन वर्षांत आठ तक्रारीहिंगणघाट : तालुक्यातील धोची येथील शाळेला कामयस्वरूपी शिक्षकाची मागणी गावकऱ्यांनी केली होती. आठ वेळा तक्रार देऊनही याकडे दुर्लक्ष झाल्याने अखेर शनिवारी संतप्त गावकऱ्यांनी शाळेला कुलूप ठोकले. यावेळी गावकऱ्यांनी जोपर्यंत कायम स्वरूपी शिक्षक पाठवत नाही, तोपर्यंत शाळेचे कुलूप उघडणार नाही, असा इशारा दिला आहे. जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या धोची या ४०० लोकसंख्येच्या गावात जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेत १ ते ५ वर्ग भरत असून ४७ विद्यार्थी आहेत. या शाळेतून २८ जुलै २०१४ पासून प्रकाश घवघवे नामक शिक्षकाची घाटसावली येथे बदली झाली होती. त्यांच्या जागेवर गोपाल शिंदे नामक शिक्षक मुख्याध्यापक म्हणून काम सांभाळत असून तो व्यसनी असल्याचे गावकऱ्यांच्या निदर्यनास आले आहे. अशातच सदर शिक्षक कुणाला कुठलीही सूचना न देता शाळा उघड्यावर सोडून निघून जात असल्याचे अनेक वेळा गावकऱ्यांच्या निदर्शनास आले. यामुळे २२ आॅगस्ट २०१६ रोजी याबाबत हिंगणघाट पंचायत समितीचे सभापती संजय तपासे यांना धोची वासीयांची तक्रार जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना दिली; मात्र त्यांच्याकडूनही कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हिंगणघाट : या सर्व प्रकारामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. याकडे शिक्षण विभागाकडून याबाबत कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही. यामुळे संतप्त गावकऱ्यांनी शाळेला कुलूप ठोकण्याचा निर्णय घेतला. शाळेला कुलूप लावतेवेळी पं.स. सदस्य ओंकार मानकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गजानन सालेकर, उपाध्यक्ष लटारी डंभारे, सरपंच प्रकाश बावणे, मधुकर डंभारे, विठोबा मानकर, वाल्मीक वाघ, तुळशीदास ठाकरे, उमेश सराटे, विलास कांबळे, कृष्णा नरूले, वैशाली दोडके, सूवर्णा डंभारे यांच्यासह गावकरी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)