शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या कार्यालयाला ठोकले कुलूप

By admin | Updated: June 30, 2016 02:13 IST

महावितरणच्या हलगर्जीपणामुळे सुसुंद्रा येथील नऊ जण गंभीर जखमी झाले, शिवाय विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांना त्रास ...

शिवसेनेचे आंदोलन : सुसुंद्रा घटनेचा निषेध, वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याचा आरोपआष्टी (शहीद) : महावितरणच्या हलगर्जीपणामुळे सुसुंद्रा येथील नऊ जण गंभीर जखमी झाले, शिवाय विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांना त्रास होत असल्याचे म्हणत वीज वितरण कंपनीच्या सहायक अभियंता कार्यालयाला शिवसेनेच्यावतीने कुलूप ठोकण्यात आले. सदर घटना मंगळवारी घडली असून माहिती होताच उपअभियंता शरद डेकाटे यांनी कार्यालयात हजेरी लावत झालेल्या चर्चेअंती प्रकरण निवळले.सुसुंद्रा येथील नऊ शेतकरी व मजूर शेतात काम करताना त्यांना विजेचा धक्का बसला. जखमी शेतकऱ्यांवर वीज वितरण कंपनीच्या सहायक अभियंत्याने भेट देखील दिली नाही. लोंबकळणाऱ्या तारा आणि वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने कंपनी नागरिकांच्या जीवावर उठल्याचा आरोप जिल्हा प्रमुख निलेश देशमुख यांनी यावेळी केला.अधिकारी कार्यालयातून बेपत्ता आष्टी (श.) : सुसुंद्रा येथील घटनेचा जाब विचारण्यासाठी सहायक अभियंता कार्यालयात आल्यावर उपअभियंता शरद डेकाटे, कनिष्ठ अभियंता काकडे व इतर कार्यालयीन कर्मचारी गैरहजर होते. याचा निषेध नोंदवित शिवसेना जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी कुलूप ठोकून कार्यकारी अभियंता गायकवाड यांना माहिती दिली. याची माहिती होताच डेकाटे कार्यालयाजवळ आले. कुलूप ठोकल्याने या कार्यालयाची चांगलीच भंबेरी उडाली. यावेळी झालेल्या चर्चेत दोषींवर कारवाई करण्याच्या आश्वासनावर सदर आंदोलन मागे घेण्यात आले.(प्रतिनिधी)