शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या कर्जाची दलालांकडून उचल

By admin | Updated: December 27, 2014 22:55 IST

शेतकऱ्यांना सातबाऱ्यावर पीक कर्ज दिले जाते़ हे कर्ज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाते़ आयसीआयसीआय बँक हिंगणघाटने सागवान खसऱ्यावर सातबाऱ्यावर नोंद करीत शेतकऱ्यांना कर्ज मंजूर केले़

आयसीआयसीआय बँकेतील प्रताप : संगनमताने व्यवहार झाल्याचा संशयप्रशांत हेलोंडे - वर्धाशेतकऱ्यांना सातबाऱ्यावर पीक कर्ज दिले जाते़ हे कर्ज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाते़ आयसीआयसीआय बँक हिंगणघाटने सागवान खसऱ्यावर सातबाऱ्यावर नोंद करीत शेतकऱ्यांना कर्ज मंजूर केले़ हे कर्ज शेतकऱ्यांना मंजूर झाले असताना रकमेची उचल चक्क दलालाने केली़ यात चार शेतकऱ्यांची ५ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक झाली आहे़आयसीआयसीआय बँक हिंगणघाट येथून शेतकऱ्यांना सात-बाऱ्यावर कर्ज मंजूर करण्यात आले़ यासाठी बँकेने विविध कागदपत्रांसह प्रत्येक शेतकऱ्याला पाच ते सात कोरे धनादेश जमा करण्यास सांगितले़ यानुसार शेतकऱ्यांनी धनादेश जमा केले़ यानंतर शेतकऱ्यांना कर्ज देण्यात आले़ पोहणा येथील विवेक बोकारे यांना ५ लाख ४० हजार ८०० रुपयांचे कर्ज मंजूर झाले़ पहिल्या टप्प्यात ३ लाख ५० हजार रुपये खात्यात जमा झाले़ कृष्णाजी दुधलकर यांना ३ लाख ७७ हजारांचे कर्ज मंजूर करून २ लाख ४३ हजार रुपये खात्यात जमा झाले़ गजानन वानखडे यांना २ लाख १२ हजार रुपयांचे कर्ज मंजूर करून १ लाख ७७ हजार ६३१ रुपये खात्यात जमा केले़ नानाजी झाडे यांना ७ लाख ६० हजार रुपयांचे कर्ज मंजूर करून ४ लाख ६० हजार रुपये जमा केले़ या कर्जातून दुधलकर यांनी ८३ हजार, बोकारे यांनी १ लाख ५० हजार, झाडे यांनी ३ लाख ५० हजार तर वानखडे यांनी ७० हजार १३१ रुपये वापरले़ उर्वरित संपूर्ण रक्कम दलाल व कर्मचाऱ्यांनी संगणमत करून फस्त केली़ यात शेतकऱ्यांना ५ लाख ३० हजार रुपयांचा फटका बसला़ दलाल मुकेश रोडे याच्यामार्फत गेलेली प्रकरणे आयसीआयसीआय बँकेने मंजूर करून कर्ज दिले़ कागदपत्रे व कोरे धनादेश शेतकऱ्यांनी बँकेचे कर्मचारी सुयोग काळे यांना दिले होते़ कर्मचाऱ्याला दिलेले धनादेश दलालाकडे कसे गेले, असा प्रश्न उपस्थित होत आहे़ शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जातील उर्वरित रक्कम मुकेश रोडे व रोहन महाजन यांनी कर्मचाऱ्यांशी संगणमत करून हडप केली़ याबाबत चारही शेतकऱ्यांनी हिंगणघाट पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली़ या प्रकरणी दलाल मुकेश रोडेविरूद्ध भादंविच्या कलम ४२०, ४०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला़ प्रकरणाचा तपास झुरमुरे यांच्याकडे देण्यात आला आहे़या प्रकरणात बँक व कर्मचाऱ्यांना अभय देण्यात आल्याचे दिसते़ या संपूर्ण प्रकाराकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे गरजेचे झाले आहे़