शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

लॉयड्सची साक्षी झुनझुनवाला अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 23:03 IST

केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाचा इयत्ता दहावीचा आॅनलाईन निकाल मंगळवारी जाहीर झाला. या निकालाची जिल्ह्यातील सुमारे १४ शाळेतील विद्यार्थ्यांना प्रतीक्षा होती. बहुप्रतिक्षीत निकालात भूगाव येथील लॉयड्स भवन्स विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारल्याचे दिसून आले आहे.

ठळक मुद्देसीबीएसईत मुलींचीच बाजी : गांधी सिटीचा रिशी आसोफा मुलांमधून प्रथम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाचा इयत्ता दहावीचा आॅनलाईन निकाल मंगळवारी जाहीर झाला. या निकालाची जिल्ह्यातील सुमारे १४ शाळेतील विद्यार्थ्यांना प्रतीक्षा होती. बहुप्रतिक्षीत निकालात भूगाव येथील लॉयड्स भवन्स विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारल्याचे दिसून आले आहे. या शाळेतील साक्षी झुनझुनवाला ही ९७.६० टक्के गुण घेवून जिल्ह्यातून प्रथम आली आहे. तर याच शाळेतील उर्वी सिन्हल ९७.२० टक्के गुण घेवून जिल्ह्यातून दुसरी ठरली. तर वर्धेतील गांधी सिटी पब्लीक स्कूलचा विद्यार्थी रिशी आसोफा याला ९७.२० टक्के गुण मिळाले. तो जिल्ह्यातून दुसरा व मुलांमधून पहिला ठरला.अग्रगामी स्कूल म्हसाळा येथील जान्हवी अढावू ही ९७ टक्के गुण घेतले. ती जिल्ह्यातून तिसरी ठरली. एकंदरीत सीबीएसईच्या निकालात जिल्ह्यात मुलींनीच बाजी मारल्याचे दिसून आले. हिंगणघाट येथील गिरधरदास मोहता विद्या मंदिर येथील हर्ष ओस्तवाल हा जिल्ह्यात मुलांमधून दुसरा ठरला. त्याला ९६.६० टक्के गुण मिळाले आहे. तर सेलूकाटे येथील नवोदय विद्यालयाचा अथर्व भोमले व संकेत बहाद्दुरे या दोघांनी ९६ टक्के गुण घेवून जिल्ह्यात मुलांमधून तिसरा येण्याचा मान पटकाविला आहे. सीबीएसई या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना निकाल सीजीपीए प्रणालीने लागत असल्याने त्यांची टक्केवारी काढणे कठीण जात असल्याचे दिसून आले आहे. पूर्वी निकाल शोधताना शाळेच्या नावावरच निकाल निघत होता. तर आता प्रत्येक विद्यार्थ्यांचा निकाल शोधावा लागल्याने शाळा प्रशासनाची चांगलीच कसरत झाल्याचे दिसून आले.सीबीएसईचा निकाल दुपारी ४ वाजता जाहीर होणार असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र दिलेल्या संकेतस्थळावर यापूर्वीच निकाल जाहीर झाला होता.जिल्ह्यात लॉयड्स भवन, रमाबाई देशमुख पब्लीक स्कूल, जवाहर नवोदय विद्यालय, स्कूल आॅफ स्कॉलर, अल्फोन्सा, स्वामी विवेकानंद, अग्रामागी म्हसाळा, गांधीसीटी पब्लीक स्कूल, चन्नावार ई लर्निंग स्कूल, माऊंट कारमेल, सेंट जॉन, हिंगणघाट, भारती विद्याभवन हिंगणघाट, केव्हीएस पुलगाव, न्यू इंग्लिश अ‍ॅकेडमी व गांधी सीटी पुलगाव या शाळांतून विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या सर्वच शाळेने उत्कृष्ट निकाल दिल्याचे दिसत आहे.साक्षीला व्हायचेय डॉक्टर९७.६ टक्के गुण घेवून जिल्ह्यात प्रथम येणाऱ्या साक्षीला डॉक्टर व्हायचे आहे. आपण नियमित दोन तास खंड न पडता अभ्यास करीत होतो. केवळ गणित व विज्ञान या विषयाची शिकवणी आपण लावली होती. २००३ मध्ये मोठ्या बहिणीनेही ९७.६ टक्के गुण मिळविले होते; पण ती द्वितीय क्रमांकावर राहिली. साक्षीच्या कुटुंबात एकूण पाच जण असून आई गृहिणी तर वडिलांचे इलेक्ट्रॉनिक्स व हार्डवेअरचे दुकान आहे.