शैलेश नवाल : ६० टक्के अनुदान अनुज्ञेयवर्धा : पशुसंवर्धन विभागामार्फत पशुपालकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. पशुपालकांना मुरघास युनिटची स्थापना करणे व कडबा कुटार यंत्राच्या वाटपासाठी थेट रक्कम पशुपालकांच्या खात्यात जमा करण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पशुपालकांनी संबंधित पशुसंवर्धन विभागांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे. जिल्ह्यात पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयामार्फत सदर योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांतर्गत पशुपालक लाभार्थ्यांना मुरघास युनिटची स्थापना करण्याकरिता ७५ हजार रकमेपैकी ६० टक्के अनुदानाची रक्कम ४५ हजार रुपये आणि विद्युतचलित कडबाकुटी यंत्रासाठी १६ हजार रुपयांपैकी ५० टक्के अनुदान ८ हजार रुपये अनुज्ञेय राहणार आहे. ही योजना सर्व समाज घटकांसाठी आहे. पशुपालकांनी या योजनांचा लाभ घेऊन आपल्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा करावी. पशुधनाचे जतन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी इच्छुक पशुपालकांनी पशुवैद्यकीय दवाखाना, पशुसंवर्धन विभाग, पं.स. तालुका लघु पशुवैद्यकीय, सर्वचिकित्सालय येथे संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
राष्ट्रीय पशुधन अभियानातील योजनांचा पशुपालकांनी लाभ घ्यावा
By admin | Updated: March 31, 2017 01:56 IST