शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

गर्भवती-स्तनदा मातांकरिता आलेल्या शिºयात अळ्या अन् सोंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 23:28 IST

गर्भवती आणि स्तनदा मातांकरिता शासनाच्यावतीने पोषण आहार म्हणून शिरा पुरविण्यात येतो.

ठळक मुद्देपिपरी (मेघे) अंगणवाडीतील प्रकार : जिल्हा परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गर्भवती आणि स्तनदा मातांकरिता शासनाच्यावतीने पोषण आहार म्हणून शिरा पुरविण्यात येतो. सुदृढ आरोग्याकरिता असलेल्या या शिºयात अळ्या अन् सोंडे निघाल्याने खळबळ माजली आहे. पिपरी (मेघे) येथील अंगणवाडीतून दिलेले पाकिट एका गर्भवती महिलेने सोमवारी घरी उघडले असता हा प्रकार समोर आला. अळ्या आणि सोंडेयुक्त पोषण आहारातून महिलांचे आरोग्य सुधारले जाईल अथवा त्यांचे आरोग्य खालावेल याचा विचार होणे गरजेचे आहे.वर्धा शहरालगतच्या पिपरी (मेघे) भागातील अंगणवाडी केंद्रातून येथील एका गर्भवती महिलेला शिºयाचे पाकिट देण्यात आले. विशेष म्हणजे देण्यात आलेल्या शिºयाच्या पाकिटावर पॅकींग तारीख म्हणून जुलै २०१७ असे उल्लेखित आहे. सोबतच पॅकींग तारखेनंतर चार महिने हे उत्पादन खाण्यायोग्य असल्याचे म्हटले आहे. असे असताना आॅगस्ट महिन्यातच त्यातून अळ्या अन् सोंडे निघाल्याने शासनाच्या योजनेवर प्रश्न निर्माण झाला आहे.महाराष्टÑ शासनाच्यावतीने महिला व बालविकास विभाग आयुक्तालयाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत गर्भवती महिला व स्तनदामाता यांच्यासाठी पोषण आहार योजना राबविण्यात येत आहे. यावर शासनाच्यावतीने कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत आहे. याच निधीतून राज्यातील ग्रामीण आणि शहरी अंगणवाडीत पोषण आहार म्हणून शिरा, उपमा, सुकडी आदी पदार्थ हवाबंद पॅकेटमधून पुरविण्यात येत आहे. यात मोठ्या प्रमाणात अनागोंदी झाल्याचे यापूर्वीही उघड झाले आहे. यामुळे गर्भवती व स्तनदा मातांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा आहार महत्त्वाचा असल्याने त्याबाबत शासनाने गंभीर असणे गरजेचे आहे.चिक्कीनंतर शिºयात अळ्याबालविकास प्रकल्पांतर्गत कुपोषित बालकांना देण्यात येणाºया चिक्कीत अळ्या निघाल्या होत्या. आता त्याच विभागांतर्गत गर्भवती आणि स्तनदा मातांना देण्यात येत असलेल्या शिºयाच्या पाकिटात अळ्या अन् सोंडे निघाले आहेत. यामुळे या पोषण आहाराच्या खरेदीत मोठ्या प्रमाणात अनागोंदी झाल्याचा अंदाज सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे.पोषण आहाराचा पुरवठा शासनस्तरावरून होतो. या संदर्भात महिलेने एकात्मिक बाल विकास प्रकल्प संचालकांकडे तक्रार करावी. या संदर्भात पाकिटाचे नमुने घेवून चौकशी करण्यात येईल.- विवेक इलमे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी तथा महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी (प्रभारी), जि.प.