लोकमत न्यूज नेटवर्कआकोली : रात्रीच्या सुमारास श्वानाची शिकार करण्याच्या बेतात असलेला बिबट विहिरीत पडला. ही बाब लक्षात येताच त्याला विहिरीबाहेर काढण्यासाठी रेस्क्यू आॅरेशन राबविण्यात आले. रात्री सुरू झालेल्या या मोहिमेनंतर वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सदर बिबट्याला विहिरीबाहेर काढण्यात सकाळी यश आले. सदर बिबट मरकसूर शिवारातील श्यामकांत चंद्रकांत वरोकर यांच्या शेतातील विहिरीत पडला होता.वरोकर यांच्या शेतात रखवालदारासोबत रात्रीला एका श्वान होता. रात्री ९.३० वाजताच्या सुमारास काळोखाचा फायदा घेत याच श्वानावर हल्ला केला. ही बाब इतर श्वानांच्या लक्षात येताच त्यांनी बिबट्याच्या दिशेने धाव घेतली. याच वेळी बिबट्याने तोंडात पकडलेल्या श्वानाला सोडून धूम ठोकली. दरम्यान, शेतविहिरीत बिबट्या पडला. ही घटना रखवालदाराच्या लक्षात येताच त्यांनी वनविभागाच्या अधिकाºयांना माहिती दिली. त्यानंतर रात्रीपासून कारंजाचे वनपरिक्षेत्र अधिकारी राऊत, क्षेत्र सहाय्यक दिनकर पाटील, प्रविण डेहनकर, उमेश शिरपूरकर, नामदेव कदम, गंगाधर मुसळे, ए. एस. सिद्दीकी, कुकडे यांच्या पथकाने शर्थीचे प्रयत्न करून सकाळी बिबट्याला विहिरीबाहेर काढले.बिबट्याला सुरक्षित बाहेर काढल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याच्या हालचाली टिपल्या. त्यावरून तो तंदुरुस्त असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.सुरक्षिततेचा उपाय म्हणून त्याला खरांगणाचे वनपरिक्षेत्र ए. एस. ताल्हण यांच्या निगराणीत बांगडापूर डेपोत ठेवण्यात आले आहे.उपवनसंरक्षक सुनील शर्मा हे स्वत: पाहणी करणार असून त्यानंतर वनविभागाचे अधिकारी पुढील कार्यवाही करणार असल्याचे सांगण्यात आले.
विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 00:06 IST
रात्रीच्या सुमारास श्वानाची शिकार करण्याच्या बेतात असलेला बिबट विहिरीत पडला. ही बाब लक्षात येताच त्याला विहिरीबाहेर काढण्यासाठी रेस्क्यू आॅरेशन राबविण्यात आले. रात्री सुरू झालेल्या या मोहिमेनंतर वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सदर बिबट्याला विहिरीबाहेर काढण्यात सकाळी यश आले.
विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान
ठळक मुद्देश्वानाची शिकार करताना पडला शेतातील विहिरीत