शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

साहित्य, सामाजिक पुरस्कार वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 21:55 IST

यशवंतराव दाते स्मृती संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या साहित्य व सामाजिक पुरस्कारांचे वितरण ज्येष्ठ समीक्षक डॉ. हरिशचंद्र थोरात, मुंबई यांच्या हस्ते करण्यात आले.

ठळक मुद्देकोल्हे, शिरसाट, पोतुलवार, महाजन, बोरूडे, सबाने मानकरी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यशवंतराव दाते स्मृती संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या साहित्य व सामाजिक पुरस्कारांचे वितरण ज्येष्ठ समीक्षक डॉ. हरिशचंद्र थोरात, मुंबई यांच्या हस्ते करण्यात आले.स्थानिक सत्यनारायण बजाज सार्वजनिक जिल्हा ग्रंथालयाच्या सभागृहात आयोजित या पुरस्कार वितरण समारोहाला संस्थेचे अध्यक्ष प्रदीप दाते, सचिव संजय इंगळे तिगावकर, पुरस्कार समिती संयोजक डॉ. राजेंद्र मुंढे, प्रा. पद्माकर बाविस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती.या समारोहात अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा बाबा पद्मनजी साहित्य पुरस्कार मुंबई येथील अविनाश कोल्हे यांना ‘चौकट वाटोळी’ या कादंबरीकरिता देण्यात आला. याशिवाय ‘झाली कथा लिहून?’ या कथासंग्रहाकरिता मधुकर धर्मापुरीकर (नांदेड) यांना शिक्षणमहर्षी बापूराव देशमुख कथासंग्रह पुरस्कार, मोहन शिरसाट (वाशिम) यांच्या ‘नाही फिरलो माघारी’ संग्रहाला संत भगवानबाबा काव्यसंग्रह पुरस्कार, डॉ. बालाजी पोतुलवार (नांदेड) यांना ‘मराठी स्त्री नाटककार : शोध आणि बोध’ या ग्रंथाकरिता अंजनाबाई इंगळे तिगावकर स्मृती स्त्रीवादी साहित्य पुरस्कार, ‘आबाची गोष्ट’ या कथासंग्रहाकरिता आबा महाजन (जळगाव) यांना पद्माकर श्रावणे स्मृती बालसाहित्य पुरस्कार, ‘चिकनगुनिया झालाच पाहिजे’ या कथासंग्रहाकरिता संजय बोरूडे (अहमदनगर) यांना भाऊराव शिंगाडे स्मृती विनोदी साहित्य पुरस्कार तर डॉ. दामोदर खडसे लिखित ‘बादलराग’ या कांदबरीच्या मराठी अनुवादासाठी चंद्रकांत भोंजाळ (मुंबई) यांना यशवंतराव दाते स्मृती अनुवाद पुरस्कार देण्यात आला.याशिवाय ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता अरूण सबाने यांना हरीश मोकलकर स्मृती सामाजिक ऋण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. हरिश्चंद्र थोरात यांच्या हस्ते सर्व पुरस्कारप्राप्त लेखकांना धनादेश, मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.तर अनुवादित साहित्याची आज दखल घेतल्या जात असल्याबद्दल चंद्रकांत भोंजाळ यांनी समाधान व्यक्त केले. मराठी जगतातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल आपल्या मनोगतातून आनंद व्यक्त करीत मोहन शिरसाट यांनी ‘हवी गं तुझ्याकडून माफी’ ही कविता सादर केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय इंगळे तिगावकर यांनी केले. पुरस्कारांबाबतची माहिती डॉ. राजेंद्र मुंढे यांनी दिली. रंजना दाते, डॉ. स्मिता वानखेडे, शेषराव बिजवार यांनी मानपत्रांचे वाचन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. पद्माकर बाविस्कर यांनी केले तर आभार प्रदीप दाते यांनी मानले.कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता प्रा. डी.के. देशमुख, गुणवंत डकरे, सुरेश वानखेडे, पंडित देशमुख, हेमंत दाते, नरेंद्र दंढारे, सुमती वानखेडे, महेश मोकलकर, अभिजित श्रावणे, अभय शिंगाडे, राजदीप राठोर, राहुल तेलरांधे, आकाश दाते, रजत देशमुख, अनिल काळे आदींचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील साहित्यप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. व्याख्यानमालेच्या द्वितीय सत्रात वºहाडी कवी, गझलकार अमरावती येथील नितीन देशमुख यांची प्रश्न टांगले आभाळाला ही काव्यमैफल रंगली. देशमुख यांचे पैजण आण बिकॉज वसंत इज कमिंग सून हे काव्यसंग्रह प्रसिद्ध असून प्रश्न टांगले आभाळाला हा संग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे. या काव्यमैफलीला वर्धेकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.लेखकांनी मांडल्या भूमिकाएकाच आयुष्यात दोन जीवन जगण्याचा अनुभव वाट्याला आला आहे, अशी भावना व्यक्त करीत अरुणा सबाने या स्त्री ही केवळ स्त्री नसते तर माणूसही असते, ही ओळख कायम ठेवा, असे आवाहन केले. ती जी काल होती, ती आज नाही, हे सिद्ध करणारी जागतिकीकरणाच्या काळातील नव्या पिढीची नायिका चाकटी मोडून जीवन जगणारी आहे, अशी भूमिका कादंबरीकार अविनाश कोल्हे यांनी मांडली.