शहरं
Join us  
Trending Stories
1
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
2
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
3
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
4
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
5
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
6
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
7
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
8
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
9
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
10
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
11
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
12
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
13
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
14
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
15
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
16
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
17
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
18
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
19
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
20
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन

मंगरूळात शाळेसमोरच चालते दारूचे दुकान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 22:32 IST

जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील मंगरूळ येथे दारूबंदी असताना सर्रास दारू विक्री सुरू आहे. दारू विक्रेता शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाजवळील परिसरात दारू विकतो त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी वीर भगतसिंग विद्यार्र्थी परिषद, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन देऊन केली आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील मंगरूळ येथे दारूबंदी असताना सर्रास दारू विक्री सुरू आहे. दारू विक्रेता शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाजवळील परिसरात दारू विकतो त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी वीर भगतसिंग विद्यार्र्थी परिषद, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन देऊन केली आहे.मंगरूळ गावामध्ये बाहेरगावावरून लोक दारू प्यायला येतात दारू पिलेले मुजोर लोक शाळा महाविद्यालयातील मुलींशी चिडीमारी करतात सदर मद्यधुंद लोकांचा व दारूविक्रेत्यांमुळे गावातील मुली व महिलांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. व तरूण व विद्यार्थी हा व्यसनाच्या आहारी जात आहे. वारंवार स्थानिक पोलीस अधिकाºयांच्या भेटी घेऊन त्यांना माहिती दिली तरीही दारू विक्री सर्रास सुरू आहे, असे नागरिकांनी जिल्हाधिकाºयांना सांगितले.निवेदन देताना मंगरूळ येथील वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, सर्कल प्रमुख किशोर तांदुळकर, तालुका उपाध्यक्ष संदीप झाडे, पोलीस पाटील अरविंद जोगवे, सरपंच सविता कुकडे, तंटामुक्त अध्यक्ष शेख इस्माईल, ग्रामपंचायत सदस्य संजू तुराळे, सचिन कुबडे, रंजना देशमुख, व्ही.बी.व्ही.पी. जिल्हा अध्यक्ष नीरज बुटे, जिजाऊ ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष योगिता इंगळे, वंदना गावंडे, मराठा सेवा संघाचे पदाधिकारी मयूर फडळे, अमर देशमुख, अ‍ॅड. कपिल गोडघाटे शुभांग मून, सुधा ढोणे, रंजना कुबडे, देविदास तिजारे, सचिन ढोणे, दीपक कुबडे, सागर पाल, अरविंद झाडे आदींसह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. स्थानिक पोलिस प्रशासनाचा वचक राहिला नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे नागरिकांनी निवेदन देतांना म्हटले आहे.पोलिसांचे अभय कुणाला? गावकºयांना की दारू विक्रेत्यालामंगरूळ हे गिरड पोलिस ठाण्यातंर्गत येणारे गाव आहे. या ठाण्यातंर्गत दारूबंदीच्या अंमलबजावणीचे अधिकार पोलिसांना आहे. असे असताना शाळा व महाविद्यालयासमोर दुकान लावून दारूविक्री करण्याची हिंमत विक्रेत्याकडे आली कशी ? हा प्रश्न निर्माण झाला आहे. लोक या प्रकारामुळे संतप्त असून यात मोठे अर्थकारण कारणीभूत असल्याचे नागरिकांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.