शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात घरोघरी गाळली जाते दारू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 11:43 IST

वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या तीन जिल्ह्यांत दारूबंदी करण्यात आली; पण पोलीस व उत्पादन शुल्क विभागाच्या अनास्थेमुळे संपूर्ण दारूबंदी फसली आहे.

ठळक मुद्देमहिला आंदोलनाच्या तयारीतउपाययोजनांचाही दुष्काळ

आॅनलाईन लोकमतवर्धा : वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या तीन जिल्ह्यांत दारूबंदी करण्यात आली; पण पोलीस व उत्पादन शुल्क विभागाच्या अनास्थेमुळे संपूर्ण दारूबंदी फसली आहे. गावोगावी अवैध दारूविक्रीचा गृहउद्योग सुरू झाल्याने अनेक ठिकाणी महिलांना अडचणींचा सामना करावा लागतो. राज्य सरकारने चंद्रपूरची दारूबंदी करताना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नाही. यामुळे दारूबंदी चळवळीत काम करणाºया कार्यकर्त्यांनी आता नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनाच साकडे घालण्याचा निर्णय घेतला.१९७५ मध्ये वर्धा जिल्ह्यातील परवानाप्राप्त दारू दुकाने बंद करण्यात आली. १९९२ मध्ये गडचिरोली आणि १ एप्रिल २०१५ ला चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्यात आली; पण हे करीत असताना शिक्षेची तरतूद असलेला कायदा बदलला नाही. यामुळे जिल्ह्यात गावोगावी अवैध दारूविक्री वाढली आहे. शिवाय परप्रांतातूनही या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दारू पाठविली जात आहे. बिहार राज्याप्रमाणे संपूर्ण राज्यात दारूबंदीचा कायदा लागू करून त्यात शिक्षेची तरतूद करणे गरजेचे आहे. हे जिल्हे दारूमुक्त करण्यासाठी शासकीय रुग्णालय व प्रत्येक तालुक्यात ३ ते ४ व्यसनमुक्ती औषधोपचार केंद्र सुरू करण्यात यावे, जिल्हाधिकारी व तहसीलदाराच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचे कार्य सुरू केले जावे. या मागण्या वर्धा जिल्ह्यातील महिला संघटनांनी केल्या आहेत. राज्यात १९६३ चा असलेला कायदा रद्द करण्यात आला; पण नव्या कायद्याची तरतूद करण्यात आलेली नाही. यामुळे दारू व्यावसायिकाला न्यायालयातूनही जामीन मिळतो. यात कठोरता आणणे गरजेचे आहे.राज्य सरकारने चंद्रपूरची दारूबंदी करताना जिल्ह्याच्या सिमेपासून २५ किमी अंतरावरील दारू खुल्या असलेल्या जिल्ह्यांतील दुकाने बंद करण्यात येतील. तीनही जिल्ह्यांत दारूबंदीच्या अंमलबजावणीसाठी स्वंतत्र पोलीस बळ दिले जाईल, असे आश्वासन दिले होते; पण अद्यापही या आश्वासनाची पुर्तता करण्यात आलेली नाही. यामुळे आता मुख्यमंत्र्यांकडेच या संदर्भात साकडे घालण्याचा निर्णय दारूमुक्ती आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे.

टॅग्स :alcohol prohibition actदारुबंदी कायदा