शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

साबरमतीच्या धर्तीवर पवनारात घाट बांधणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 12:43 IST

आॅनलाईन लोकमतवर्धा : सेवाग्राम विकास आराखड्यात पवनार व वर्धा शहरातील ही विकास कामांचा समावेश आहे. त्यामुळे या दोन ठिकाणी विकास आराखड्यांतर्गत कामे केले जाणार आहेत. गुजरात राज्यातील साबरमती येथे असलेल्या नदी घाटाच्या धर्तीवरच पवनार येथील धाम नदीच्या घाटाची बांधणी केली जाणार आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात पवनार भागात विकास कामांना ...

ठळक मुद्दे१ कोटी ६० लाख १०० रूपयांचा खर्च अपेक्षिततीन रेल्वे स्थानकांचा विकास होणार च्वर्धा-सेवाग्राम-पवनार या कॉरीडॉरमध्ये येणाऱ्या तीन रेल्वे स्थानकाचाही विकास करण्यात येणार आहे. यामध्ये सेवाग्राम, वर्धा, वरूड रेल्वे स्थानकाचा समावेश आहे. या रेल्वे स्थानकावर अभ्यागतांना सुविधा देण्यासोबतच त्यांचे नूतनी

आॅनलाईन लोकमतवर्धा : सेवाग्राम विकास आराखड्यात पवनार व वर्धा शहरातील ही विकास कामांचा समावेश आहे. त्यामुळे या दोन ठिकाणी विकास आराखड्यांतर्गत कामे केले जाणार आहेत. गुजरात राज्यातील साबरमती येथे असलेल्या नदी घाटाच्या धर्तीवरच पवनार येथील धाम नदीच्या घाटाची बांधणी केली जाणार आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात पवनार भागात विकास कामांना गती येणार आहे.आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी असलेल्या पवनार नगरीच्या विकासासाठी यापुर्वी राज्य सभेच्या सदस्य राहिलेल्या खा. निर्मला देशपांडे यांच्या निधीतून मोठ्या प्रमाणावर विकास कामे करण्यात आले. त्यानंतर आता सेवाग्राम विकास आराखड्यात पवनार व वर्धा हे दोन गावेही जोडण्यात आले आहे. त्यामुळे विनोबांच्या कर्मभूमीत पुन्हा नव्याने विकास कामांची भर पडणार आहे. सेवाग्राम वर्धा आणि पवनार विभागातील सांस्कृतिक आणि ऐतिहासीक स्थळांचा विकास, रस्त्यालगतच्या इमारती व ऐतिहासीक वास्तूंचे संवर्धन, रस्त्यावर सावलीसाठी आॅनिंग व बसण्यासाठी बाक जमिनीवर वेगळ्या लाद्या बसविणे आदी कामांकरिता १ कोटी ६० लाख १०० रूपये निधी मंजूर करण्यात आला आहे.याशिवाय ऐतिहासीक वास्तूंना जोडणारा हेरिट्रेज ट्रेल पादचारी मार्ग बनविणे व त्याचे सुशोभिकरण करणे या कामासाठी १ कोटी ५० लाख रूपये खर्च केले जाणार आहे. पवनार गावातील दिल्लीगेट व परिसराचा वारसा संवर्धन करण्यासाठी १ कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहे. रस्त्यालगत वृक्षारोपण, माहितीफलक आदींकरिताही निधी खर्च केला जाणार आहे. याशिवाय पवनार व परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, पादचारी मार्ग तयार करण्यात येणार असून धाम नदी काठाचा विकास, नूतनीकरण व सुशोभिकरण, नदीच्या दोन्ही बाजूस व पवनार आश्रमसमोर ते समाधीपर्यंत चालण्यासाठी पादचारी रस्ता व नदीकाठाची स्वच्छता व साफसफाई, बंधाºयाचे वनीकरण, नदीकाठाचे नूतनीकरण आदी सुविधांवर २ कोटी ६५ लाख ५ हजार रूपयांचा निधी खर्च केला जाणार आहे.पवनार येथे नदी काठाचे बांधकाम साबरमती नदी काठावरील घाटाच्या धर्तीवर करण्यात येणार आहे. तसेच पर्यटन सुविधाच्या दृष्टीकोनातून विश्रांतीसाठी जागा, शौचालय, पिण्याचे पाणी, माहिती व जनसंपर्क केंद्र पवनार येथील बसस्टँन्डवर सुविधा निर्माण केल्या जाणार आहे.साबरमतीच्या धर्तीवर पवनार येथील धाम नदीच्या नदीघाटाचे बांधकाम करण्यात येणार आहे. वर्धा जिल्ह्याला आचार्य विनोबा भावे व महात्मा गांधी या महापुरूषांमुळे जागतिक स्तरावर विशेष महत्व आहे. त्यामुळे विकास आराखड्यातून पवनारचा विकास करताना या बाबीला महत्व दिले जाणार आहे.- डॉ. पंकज भोयर, आमदार, वर्धा विधानसभा

टॅग्स :cultureसांस्कृतिक