शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात कमळ

By admin | Updated: May 17, 2014 00:23 IST

काँग्रेसचे सागर मेघे आणि भाजपाचे रामदास तडस यांच्यात झालेल्या लढतीत तडस यांनी तब्बल २ लाख १५ हजार ७८३ मतांची विक्रमी आघाडी घेत काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या

वर्धा : काँग्रेसचे सागर मेघे आणि भाजपाचे रामदास तडस यांच्यात झालेल्या लढतीत तडस यांनी तब्बल २ लाख १५ हजार ७८३ मतांची विक्रमी आघाडी घेत काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या वर्धा लोकसभा मतदार संघात भगवा फडकाविला. तडस यांना तब्बल ५ लाख ३७ हजार ५१८ इतकी मते मिळाली, तर सागर मेघे यांना ३ लाख २१ हजार मते मिळाली. ही मते २00९ च्या तुलनेत ३१ हजार ११८ मतांनी कमीच आहे.

तिसर्‍या क्रमांकावर बसपाचे चेतन पेंदाम यांना ९0 हजार ८६६ मतांवरच समाधान मानावे लागले. तर आम आदमी पार्टीचे उमेदवार अलीम पटेल यांची कामगिरी अतिशय निराशाजनक राहिली. त्यांना १५ हजार ७३८ मतांवरच आपला गाशा गुंडाळावा लागला. स्थानिक एफसीआयच्या गोडावूनमध्ये सकाळी ८.३0 वाजतापासून मतमोजणीला प्रारंभ झाला. ९ वाजता पहिल्या फेरीचे मतदान हाती आले. पहिल्या फेरीतच भाजपाचे उमेदवार रामदास तडस यांनी तब्बल ८ हजार ८८८ मतांची आघाडी घेतली. ही आघाडी फेरीगणिक वाढतच गेल्याने सागर मेघे यांचा पराभव आणखीच गडद होत गेला. २६ व्या अंतिम फेरीपर्यंत तडस यांची आघाडी २ लाख १५ हजार ७८३ पर्यंत गेली. अंतिम आकडेवारी येताच तडस यांना निवडणूक निर्णय अधिकारी एन. नवीन सोना यांनी विजयी घोषित केले. २00९ च्या निवडणुकीत बसपाचे उमेदवार बिपीन कंगाले यांनी तब्बल १ लाख ३१ हजार ६८३ मते घेतली होती. या निवडणुकीत बसपाचे उमेदवार चेतन पेंदाम तिसरा क्रमांक अबाधित राखण्यात यशस्वी झाले असले तरी त्यांना मताधिक्य टिकविण्यात मात्र अपयश आले. चवथ्या क्रमांकावर आपचे अलीम पटेल असले तरी त्यांना अपेक्षेपेक्षा यश मिळविता आले नाही. निवडणूक निकालावर दृष्टी फिरविल्यास जिल्ह्यात चौफेर मोदीचीच जादू असल्याचे निकालातून दिसून आले. वर्धा लोकसभा मतदार संघातील हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात तडस यांना सर्वाधिक ५६ हजार ११, तर मोर्शीत ५१ हजार ८७१ आघाडी मिळाली. धामणगाव २५ हजार ४२१, वर्धा ३६ हजार २७९ आणि देवळी विधानसभा क्षेत्रातून ३0 हजार ५२६ मतांची भर त्याच्या खात्यात पडली. आर्वीत भाजपाचे आमदार असताना मात्र येथे सर्वात कमी म्हणजे १५ हजार ३४0 मतांचेच मताधिक्य मिळाले. एकूणच सहाही विधानसभा क्षेत्रात भाजपला प्रचंड मताधिक्य मिळाले. इतर उमेदवार मात्र चमत्कार दाखवू शकले नाही.(जिल्हा प्रतिनिधी)