शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या तारांना झाडांचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 23:45 IST

गावात विद्यूत पुरवठा करणाऱ्या महावितरणच्या तारांना झाडांचा विळखा पडला आहे. वीज पुरवठा करणाºया तारा या झाडांमुळे एकमेकांना स्पर्श होत असल्याने पुरवठा खंडीत होत असल्याचे प्रकार घडत आहे.

ठळक मुद्देमहावितरणचे दुर्लक्ष : अपघात होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : गावात विद्यूत पुरवठा करणाऱ्या महावितरणच्या तारांना झाडांचा विळखा पडला आहे. वीज पुरवठा करणाºया तारा या झाडांमुळे एकमेकांना स्पर्श होत असल्याने पुरवठा खंडीत होत असल्याचे प्रकार घडत आहे. यामुळे महावितरणने तारांवर चढलेली झाडे तोडून त्या तारा मोकळ्या कराव्या अशी मागणी होत आहे.चिकणी गावालगतच प्रदीप भोयर व मनोज देशमुख यांचे शेत आहे. देशमुख यांच्या शेतात जाणाऱ्या विद्युत पुरवठ्याच्या तारा लोबंकळत असून तारांमध्ये झाडाच्या फांद्या गेल्या आहेत. त्याला वेलींचा विळखा बसला आहे. यामुळे केव्हाही तारांमध्ये घर्षण होवून आग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. कुठल्याही प्रकारची दुर्घटना घडू नये याकरिता संबंधित विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.ग्रामीण भागात वीज पुरवठा सुरू झाला त्याच काळापासून वीज तारा व तेच खांब आहेत. काही ठिकाणी तर पोल सुद्धा जीर्ण झाले आहे. काही ठिकाणच्या तारा नेहमीच तुटत असतात. चिकणी शिवारात देवळी पांदण रस्त्यावरून कृषी पंपाला विद्युत पूरवठा करणारी वीज वहिनी गेली आहे. ही वीज वाहिनी प्रदीप भोयर यांच्या शेतातून मनोज देशमुख यांच्या शेतात गेली आहे; परंतु भोयर व देशमुख यांच्या धुºयावरील झाडाच्या फांद्या तारांमध्ये गेल्याने येथे नेहमीच वीज पुरवठा खंडित होतो. या तारांच्या घर्षणामुळे केव्हाही आग लागून मोठी विपरीत घटना घडण्याची शक्यता बळावली आहे. यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी व ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून येते. या करिता सदर ग्रामपंचायतीने संबंधीत विभागाला याची माहिती दिली असून त्यांच्याकडून अद्यापपर्यंत कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही. यामुळे सबंधीत विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सदर तारांमधील फांद्या तोडून वीज तार मोकळ्या कराव्यात अशी मागणी चिकणी येथील शेतकऱ्यांची आहे.शेतकऱ्यांनीही लक्ष देण्याची गरजशेतात असलेल्या कृषी पंपाला विद्युत पूरवठा करणाऱ्या तारांना त्यांच्याच धुऱ्यावरील झाडांच्या फांद्यांचा वेढा पडल्याने पूरवठा वारंवार खंडीत होतो. यामुळे शेतकऱ्यांनी महावितरणकडून झाडे तोडण्याची प्रतीक्षा करण्यापेक्षा स्वत:च्या शेतातील झाडे तोडली तर विद्युत पूरवठा खंडीत होण्याच्या प्रकाराला आळा बसण्याची शक्यता आहे.

टॅग्स :electricityवीज