शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण उठले शेतकºयांच्या जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 01:23 IST

कृषी पंपाची थकबाकी असलेल्या शेतकºयांच्या पंपाची वीज कापण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. ऐन रब्बी हंगामाच्या तोंडावर घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे ओलिताची सोय असलेल्या शेतकºयांसमोर नवी समस्या निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देथकबाकीदार कृषी पंपाची जोडणी कापणार : रब्बी हंगामावर धोक्याचे सावट

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कृषी पंपाची थकबाकी असलेल्या शेतकºयांच्या पंपाची वीज कापण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. ऐन रब्बी हंगामाच्या तोंडावर घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे ओलिताची सोय असलेल्या शेतकºयांसमोर नवी समस्या निर्माण झाली आहे. शेतकरी हितेशी असलेल्याचा दिखाचा करणाºया उर्जा विभागाने घेतलेला हा निर्णय शेतकºयांच्या जीवावर उठल्याचे बोलले जात आहे.कृषी पंपाची जोडणी कापण्याच्या या बडग्यातून बचावाकरिता शेतकºयांना सुरू महिन्याचे देयक भरण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. खरीप हंगाम शेतकºयांना अपेक्षेनुरूप झाला नाही. शिवाय उत्पादनाला मिळणारे दर शेतकºयांना न परवडणारे आहे. यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकºयांना कुठल्याही रकमेचा भरणा करणे शक्य नसल्याचे वास्तव आहे. यामुळे कृषीपंप धारक शेतकºयांची चिंता वाढली आहे.खरीप हंगामात उत्पन्न झाले नसल्याने ओलीताची सोय असलेल्या शेतकºयांकडून रबी हंगामाची तयारी सुरू केली आहे. सोयाबीनची कापणी केल्यानंतर रबी हंगामाकरिता शेत तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. रबीची पेरणी करण्यापूर्वी शेतात मोठ्या प्रमाणात सिंचन करण्याची पद्धत आहे. या सिंचनाच्या कामाची तयारी शेतकºयांनी केली आहे. यात विहिरीत उपलब्ध असलेले पाणी आणि नदी काठावर अथवा शेततळे असलेल्या शेतकºयांनी तेथून मोटारपंप लावून शेतात पाणी आणण्याचे काम सुरू केले आहे. या कामाला गती येत असतानाच महावितरणकडून थकबाकीदार कृषीपंप धारकांच्या जोडण्या कापण्याचे फरमान सोडले आहे. यामुळे रबीची तयारी करणाºया शेतकºयांची चिंता वाढली आहे. याचा विचार शासनाने करणे गरजेचे झाले आहे.६६ हजार हेक्टर क्षेत्रावरील रब्बीचा पेरा संकटातवर्धा जिल्ह्यात यंदा पाऊस प्रमाणाच्या तुलनेत कमी झाला. यामुळे ओलिताचे क्षेत्र कमी होईल असे वाटत होते. तो अंदाज खरा ठरत आहे. वर्धेत यंदा ६६ हजार २७५ हेक्टरवर रबीचा पेरा होणार असल्याचे नियोजन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. गत वर्षी जिल्ह्यात ८० हजार हेक्टरवर रबीचा पेरा झाला होता. गत वर्षी चन्याला बºयापैकी भाव मिळाला होता. यामुळे यंदा चन्याचा पेरा वाढण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त गहू आणि इतर रबी पिके आहेतच.वर्धेतील ६८,२०१ शेतकºयांकडे ८६.१२ कोटीवर्धा जिल्ह्यातील कृषी पंपाची थकबाकी ८६ कोटी १२ लाख रुपयांवर असल्याचे महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांकडून सांगण्यात आले आहे. असलेली थकबाकी आणि विजेची वाढती मागणी यात सांगड घालण्याकरिता महावितरणच्यावतीने हा निर्णय घेण्यात आला असावा असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. जिल्ह्यातील १५ हजार कृषी पंप धारकांनी जेव्हापासून जोडणी घेतली त्या काळापासून देयकाचा भरणा केला नाही तर ४८ हजार ग्राहकांनी ज्या गत वर्षभरापासून देयक भरले नाही. एका वर्धा जिल्ह्यात एवढी थबकाकी असताना वीज पुरवठा कसा करावा असा प्रश्न निर्माण झाला आहे. इतर जिल्ह्यातही अशीच स्थिती असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. यातून बचावाकरिता सुरू वर्षाचे देयक भरणे गरजेचे झाले आहे.