शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

जीवदान देणारी हेल्मेट मोहिम वर्ध्यात थंडावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 15:45 IST

सुरक्षित प्रवासाला केंद्रस्थानी ठेवून हेल्मेटच्या वापराबाबत काही सूचना न्यायालयाने दिल्या होत्या. वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुरव यांची बदली होताच ही विशेष मोहीम बारगळल्याचे दिसते.

ठळक मुद्देयोजना राबविण्यात अडथळा ठरताहेत एसपींच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: सुरक्षित प्रवासाला केंद्रस्थानी ठेवून हेल्मेटच्या वापराबाबत काही सूचना न्यायालयाने दिल्या होत्या. त्यानुसार वर्ध्यातील तत्कालीन पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांच्या कार्यकाळात हेल्मेट वापरणे अनिवार्य करण्यात आले. मात्र त्यांची तसेच वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुरव यांची बदली होताच ही विशेष मोहीम बारगळल्याचे दिसते. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली नियुक्त झाल्यानंतरही ही मोहिम थंडावलेलीच राहिली. पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांच्या कार्यकाळात तरुण-तरुणींसह नागरिकांमध्ये हेल्मेटच्या वापराबाबत जनजागृती करण्यात आली होती. नवीन पोलीस अधीक्षकांकडून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी वर्धेला येण्यापूर्वी देण्यात आलेल्या हेल्मेटविषयक सूचनांमुळे सदर मोहीम बारगळल्याची चर्चा होत आहे. इतकेच नव्हे तर वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक चांदे यांच्या अवघ्या काहीच महिन्यांच्या कार्यकाळात वाहतूक व्यवस्था कोलमडली असल्याचे दिसून येत असल्याने पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत योग्य पाऊल उचलण्याची गरज असून तशी मागणीही आहे.नो-पार्किंगच्या नावाखाली वाहनांची उचलवर्धा शहरात ठिकठिकाणी रस्त्यांच्या सिमेंटीकरणाचे काम सुरू असताना वाहतूक पोलीसांकडून कुठलीही सहानुभूती न दाखविता नो-पार्किंगमध्ये वाहन उभे केल्याचे कारण पुढे करून थेट वाहने उचलून वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेत नेली जात आहेत. शिवाय वाहनचालकांकडून कारवाईचा धाक दाखवून दंड वसूल केला जात आहे. ज्या परिसरात रस्त्याच्या सिमेंटीकरणाची काम सुरू आहे त्याच भागातून नो-पार्कींगचे कारण पुढे करून वाहतूक पोलिसांकडून सर्वाधिक दुचाकी वाहने ताब्यात घेतली जात आहेत, हे विशेष.१५ चालानचे टार्गेट?वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने शहरातील विविध भागात दररोज वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात येते. कर्तव्यावर असलेले कर्मचारी आपले काम व्यवस्थित आणि प्रामाणिकतेने करण्याचा प्रयत्न करतात. परंतु, सध्या एका पॉर्इंटवरील कर्मचाºयांना दिवसभºयात कमीत कमी १५ चालान नागरिकांना देण्याच्या सूचनाच दिल्या असल्याची चर्चा होत आहे. त्यामुळे याचा त्रास वाहनचालकांना होत आहे.अधिकारी बदले असले तरी ही मोहीम ठप्प पडली असे म्हणता येणार नाही. हेल्मेटचा वापर हा नागरिकांसाठी फायद्याचा असून लवकरच पुन्हा नव्या जोमाने हेल्मेट वापर व जनजागृतीची मोहीम राबविण्यात येईल. नागरिकांनीही त्याला सहकार्य करावे.- निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक, वर्धा.सुरक्षेच्या दृष्टीकोणातून हेल्मेटचा वापर गरजेचा आहे. देवी-देवतांचे मुकुट त्यांच्या मानाचा तुरा असून प्रत्येकांचे मुकुट वेगळे नाही. ते अप्रत्यक्ष मानवी समाजाला सुरक्षेचा संदेश देतात.- प्रदीपचंद्र कुळकर्णी, समुद्रपूर.मागील काही महिन्यांपासून हेल्मेट विषयीची मोहीम बारगळली आहे. ती नव्या जोमाने राबविणे आवश्यक आहेच.- विकास दांडगे, शहर प्रमुख, प्रहार, वर्धा.वर्धा शहरात ठिकठिकाणी सिमेंट रस्ते तयार होत असून अनेक ठिकाणी सिमेंटचेच रस्ते आहेत. काही रस्ता अपघातात हेल्मेटमुळे प्राण वाचले आहे. त्यामुळे अनुचित प्रकार टाळण्यासाठी शहरातही हेल्मेटचा वापर गरजेचा आहे.- निहाल पांडे, संस्थापक अध्यक्ष, युवा परितर्वन की आवाज, वर्धा.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा