शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

वृद्धाची हत्या प्रकरणातील आरोपीस जन्मठेप

By admin | Updated: June 21, 2014 02:00 IST

वृद्धाची अमानुषरित्या मारहाण करून निर्घृण हत्या करण्यात आली होती़ या प्रकरणातील आरोपी गणपत किशोर भांगे

वर्धा : वृद्धाची अमानुषरित्या मारहाण करून निर्घृण हत्या करण्यात आली होती़ या प्रकरणातील आरोपी गणपत किशोर भांगे यास जिल्हा व सत्र न्यायाधीश विभा कंकनवाडी यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली़ हा निर्वाळा गुरूवारी दुपारी देण्यात आला़कारंजा (घा.) येथे माणिक चाफले यांचे घर आहे. २०११ मध्ये माणिक चाफले यांचा मुलगा महादेव हा पंढरपूर येथे गेला होता. त्यावेळी आरोपी गणपतने महिलेस कामावर का येत नाही, अशी विचारणा केली़ यावरून वाद उत्पन्न झाला होता. यानंतर महादेव चाफले यांनी गणपत यास मारहाण केली होती. १ आॅगस्ट २०१२ रोजी गणपत भांगे याने महादेव चाफले यांच्या घरासमोर येत शिवीगाळ केली़ यामुळे महादेवची पत्नी संगीता ही त्याला बोलविण्यास गेली. दोघेही पती-पत्नी घरी येत असताना गणपतने वाटेतच जवळ असलेल्या काठीने संगीताला मारहाण केली. घडलेल्या प्रकाराची तक्रार देण्याकरिता दोघेही कारंजा येथे गेले. माणिक चाफले व महादेवची मुलगी वनीता (११) घरी होते. गणपतने पुन्हा चाफले यांच्या घरासमोर येत शिवीगाळ केली़ काही वेळाने गणपतने टीकाशीच्या दांड्याने माणिक यांना जबर मारहाण केली़ यात त्यांचा जागीच मृत्यू झाला़ ही संपूर्ण घटना ११ वर्षीय वनीताने पाहिली. या प्रकरणी महादेव चाफले यांनी कारंजा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविल्यानंतर आरोपी गणपत यास अटक करण्यात आली. संपूर्ण घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक जनार्दन साळुंके यांनी केला़ तपासांती प्रकरण न्यायप्रविष्ट करण्यात आले़ सदर प्रकरण जिल्हा व सत्र न्यायाधीश विभा कंकनवाडी यांच्यासमोर न्यायदानाकरिता आले असता शासकीय अभियोक्ता विनोद देवघरे यांनी ५ साक्षदार तपासले. यात प्रत्यक्षदर्शी वनीताचीही साक्ष नोंदविण्यात आली़ दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्या़ कंकनवाडी यांनी आरोपी गणपत भांगे यास भादंविच्या कलम ३०२ अन्वये जन्मठेपेची तर कलम ३२४ अंतर्गत तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावली. दोन्ही शिक्षा एकत्र भोगावयाच्या आहेत़ कारंजा पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार प्रमोद डोणे यांनी शासकीय वकिलांना प्रकरण चालविण्याकरिता सहकार्य केले़(कार्यालय प्रतिनिधी)