शासनाच्या उपक्रमाला ग्रहण : शिक्षण विभागाच्या योजनेकडे शिक्षकांचीही पाठरूपेश खैरी - वर्धाशिक्षकांना शालेय उपक्रमात दर्जेदार उपक्रम मिळावे याकरिता मार्गदर्शक पुस्तिका म्हणून राज्य शासनाच्या शिक्षण विषयक संशोधन व परिक्षण परिषद पुणे यांच्याकडून ‘जीवन शिक्षण अंक’ पुरविण्यात आला; मात्र जिल्हा प्रशासनाकडून होत असलेल्या अनागोंदी कारभारामुळे तो शिक्षकांपर्यंत पोहोचत नसल्याने शासनाच्या या प्रयत्नाला प्रतिसाद मिळत नसल्याचे वास्तव आहे. हा अंक सुरू करण्याला आज वर्षांचा कालावधी झाला तरी त्याच्या केवळ दोनच प्रती शिक्षकांपर्यंत पोहोचल्या असल्याची माहिती आहे. जीवन शिक्षण अंक हा राज्य शासनाचा असल्याने तो प्रत्येक शिक्षकाने घ्यावा, अशी सक्ती शिक्षण विभागाच्यावतीने करण्यात येत आहे. हा अंक प्रत्येक शिक्षकाने वर्गणीतून घ्यावा असा आदेशच शिक्षण विभागाने पारीत केला. यामुळे शिक्षकांत या बाबत काही प्रमाणात नाराजी पसरली. या अंकात शिक्षण विषयक उपक्रमाची बरीचशी उपयोगी अशी माहिती असल्याने अनेक शिक्षकांनी तो सुरू केला. पूर्वी हा अंक डाक विभागाने शिक्षकाच्या घरी येत होता; मात्र डाक विभागाच्या दिरंगाईचा फटका असल्याने त्याची वर्गणी केंद्र प्रमुखाकडे गोळा करण्याचे आदेश निघाले. यानुसार शिक्षकांनी ती वर्गणी केंद्र प्रमुखाकडे गोळा केली. यामुळे अंक पंचायत समितीत येवू लागले; मात्र ते तिथून शिक्षकांपर्यंत पोहचू शकले नसल्याने त्याचा काहीच उपयोग होत नसल्याचे दिसून येत आहे. हा अंक शिक्षण शाळेतून लावल्यास त्याला शाळा खर्चातून अनुदान देण्यात येत आहे. मात्र शिक्षकाने स्वत: वर्गणी करून तो अंक विकत घेतल्यास त्याचा पूर्ण भुर्दंड शिक्षकावर बसणारा आहे. हा अंक प्रकाशित होण्यास सुरुवात झाली त्याच वेळी जिल्हा परिषदेच्यावतीने शिक्षकांच्या पगारातून वर्गणीची रक्कम थेट कपात करण्यात आली. याचा विरोधही करण्यात आला होता. यामुळे शैक्षणिक उपक्रमात उपयोगी पडणाऱ्या या अंकाकडे पाठ दाखविल्याचे चित्र आहे.
जीवन शिक्षण अंकाला दिरंगाईचा फटका
By admin | Updated: December 20, 2014 22:43 IST