नागपूर बायपासवरील साटोडा परिसरातील रस्त्याच्या कडेला असणाऱ्या निवेदिता निलयमसमोरील एका पडक्या विहिरीत गुरूवारी एक कुत्रा पडला होता. जवळपास ३० ते ३५ फूट खोल असलेल्या या विहिरीत दिवसभरापासून कुत्रा पडून असल्याची माहिती नागरिकांनी पीपल फॉर अॅनिमल्सच्या कार्यकर्त्यांना दिली. यानंतर कार्यकर्ते घटनास्थळी पोहचले. विहीर मुरूमरहित असल्यामुळे कुत्र्याला बाहेर काढणे कठीण होते. अखेर अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर कुत्र्याला सुखरूप एका कार्यकर्त्याने बाहेर काढले. पीपल फॉर अॅनिमल्सचे कौस्तुभ गावंडे, सुमित जैन, अरुण गोस्वामी, अनुराग भोयर, गणेश मसराम यांच्या चमुने कुत्र्याला विहिरीतून बाहेर काढण्यात यश मिळविले.
श्वानाला जीवदान...
By admin | Updated: May 23, 2015 02:23 IST