शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

१८ खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 05:00 IST

खरीप हंगाम २०२०-२१ मध्ये एप्रिल ते जुलै या कालावधीत जास्त युरिया खत खरेदी केलेल्या २० शेतकऱ्यांची व त्यांना विक्री केलेल्या कृषी केंद्राची तपासणी करून कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या. त्यानंतर ही माहिती चौकशीकरिता कृषी विभागाला देण्यात आली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे यांच्या मार्गदर्शनात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली.

ठळक मुद्देनियमबाह्य युरियाची विक्री भोवली : कृषी विभागाने चौकशीअंती केली कठोर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नियमबाह्य खत विक्री केल्याचा ठपका ठेऊन कृषी विभागाने तब्बल १८ कृषी केंद्र व्यावसायिकांचे खत विक्रीचे परवाने निलंबित केले आहे. केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या यादीच्या आधारे चौकशी करून दोषी आढळलेल्या कृषी केंद्र व्यावसायिकांवर ही कठोर कारवाई करण्यात आली आहे.प्राप्त माहितीनुसार, केंद्र शासनाच्या सुचनेनुसार रासायनिक खतांची विक्री पॉस मशिनद्वारे शेतकऱ्यांना करणे क्रमप्राप्त आहे. पण त्याकडे दुर्लक्ष केल्याचे लक्षात येताच चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला केंद्र शासनाकडून प्राप्त झाल्या. खरीप हंगाम २०२०-२१ मध्ये एप्रिल ते जुलै या कालावधीत जास्त युरिया खत खरेदी केलेल्या २० शेतकऱ्यांची व त्यांना विक्री केलेल्या कृषी केंद्राची तपासणी करून कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या. त्यानंतर ही माहिती चौकशीकरिता कृषी विभागाला देण्यात आली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे यांच्या मार्गदर्शनात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली.चौकशीदरम्यान डेकाटे कृषी केंद्र करंजी (भोगे), लक्ष्मी कृषी प्रतिष्ठान, सेवाग्राम, अरूण सिडस् अ‍ॅण्ड पेस्टीसाईड वर्धा, किसान अ‍ॅग्रो कृषी केंद्र पुलगाव, वैशाली कृषी केंद्र, सेलू, पराग कृषी केंद्र, सेलू, पंकज कृषी केंद्र हमदापूर, बलदेव कृषी केंद्र, अल्लीपूर, साखरकर कृषी केंद्र, काचनगाव, आदर्श कृषी केंद्र पवनी, भोजाजी कृषी केंद्र, आर्वी छोटी, अमोल कृषी केंद्र वडनेर, हरिओम अ‍ॅग्रो ट्रेडर्स, हिंगणघाट, श्रीनाथ कृषी केंद्र, हिंगणघाट, शुभम कृषी केंद्र, हिंगणघाट, शुभम कृषी केंद्र समुद्रपूर, बाभुळकर कृषी केंद्र, समुद्रपूर, जैन कृषी केंद्र, समुद्रपूर, गौळकर कृषी केंद्र, गिरड हे दोषी आढळल्याने सुरूवातीला त्यांना नोटीस बजावून जनसुनावणी घेण्यात आली. कृषी केंद्र व्यावसायिकांची बाजू जाणून घेतल्यावर त्यांचे खत विक्रीचे परवाने निलंबित करण्यात आले आहे.एकाच शेतकऱ्याच्या नावाने पॉस मशीनद्वारे जादा खताची केली विक्रीउपविभागीय कृषी अधिकारी यांनी शासनाकडील प्राप्त यादीनुसार कृषी केंद्राची तपासणी केली असता केंद्र शासनाच्या सुचनेनुसार कृषी केंद्रांनी प्रत्येक शेतकºयाला खत विक्री करताना ती पॉस मशिनद्वारे करणे अनिवार्य असताना संबंधीत कृषी केंद्राने एकाच शेतकऱ्याचे नाव आणिआधार कार्डचा वापर करून युरियाची विक्री केली. परंतु प्रत्यक्षात हे खत इतर शेतकऱ्यांना विक्री करून अनियमितता केल्याचे तपासणीमध्ये निष्पन्न झाले आहे.सहा महिन्यांपर्यंत करता येणार नाही खत विक्रीपरवाना निलंबित करण्यात आलेल्या १८ कृषी केंद्र व्यावसायिकांना पुढील सहा महिन्यांपर्यंत खताची विक्री करता येणार नाही, असे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांवरही कृषी विभाग लक्ष ठेवणार आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्र