शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

अस्वच्छतेमुळे हॉटेल ‘गणराज’चा परवाना निलंबित

By admin | Updated: February 18, 2017 01:28 IST

अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ च्या स्वच्छतेचे नियम पालन करण्यात हयगय केल्याने मुख्य मार्गावरील हॉटेल गणराजचा परवाना १० दिवसांकरिता

अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत कारवाई वर्धा : अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ च्या स्वच्छतेचे नियम पालन करण्यात हयगय केल्याने मुख्य मार्गावरील हॉटेल गणराजचा परवाना १० दिवसांकरिता निलंबित करण्यात आला आहे. तसे आदेश हॉटेल मालकाला देण्यात आले असून १६ ते २५ फेब्रुवारी २०१७ या काळात सदर हॉटेल बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती अन्न सुरक्षा विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी ललित सोयाम व रविराज धाबर्डे यांनी ३० नोव्हेंबर २०१६ रोजी हॉटेल गणराज, येथे तपासणी केली. यात हॉटेलमध्ये अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६, नियम व नियमन २०११ च्या अनेक तरतुदीचे उल्लंघन, तसेच सदर हॉटेलमध्ये अस्वच्छता असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानुसार अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांंतर्गत सदर हॉटेलचे मालक अजय भुते यांना हॉटेलमध्ये सुधारणा करण्याकरिता नोटीस बजावण्यात आली होती. त्यांना सुधारणा करण्याकरिता पुरेसा कालावधी देण्यात आला होता. मात्र पुन्हा केलेल्या तपासणीत या हॉटेल मालकाने कुठलीही सुधारणा केली नसल्याचे दिसून आले. यामुळे सदर प्रकरणात आढळलेले दोष, कायद्यांतर्गत कलमांच्या उल्लघनाबाबत प्रकरण तपासी अधिकाऱ्यांनी सहायक आयुक्त (अन्न) तसेच परवाना अधिकारी, अन्न व औषध प्रशासन जयंत वाणे यांच्याकडे सादर केले होते. आणखी पाच हॉटेलवर येणार गंडांतर अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांंतर्गत आपल्या हॉटेलात स्वच्छता न बाळगता अनेक बाबींकडे दुर्लक्ष करण्यात आलेल्या तब्बल पाच हॉटेलवर परवाना निलंबणाची कारवाई करण्यात येणार आहे. ती हॉटेल कोणती याची माहिती मात्र विभागाकडून देण्यात आली नाही. ही कारवाई येत्या दिवसात होईल, असे सांगण्यात आले आहे.