शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

ग्रंथालय जनमानसातला महत्त्वाचा घटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 05:00 IST

प्रियदर्शनी महिला महाविद्यालयातील ग्रंथालय विभागाच्यावतीने पाच दिवसीय वेबिनार ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम अ‍ॅण्ड फ्युचर लॉयब्रियनशीप’ यावर आयोजित करण्यात आलेला आहे. याचे सोमवारी ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. प्रा. अमृत देशमुख यांनी मेक इंडिया रिड बुकलेट यावर मार्गदर्शन करताना वाचावे कसे, काय वाचावे, गती काय असावी असे सांगत १३५० पुस्तके वाचल्याचे सांगितले.

ठळक मुद्देभालचंद्र मुणगेकर : प्रियदर्शिनी महिला महाविद्यालयात वेबिनार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आजच्या परिस्थितीत चालती बोलती ग्रंथालये कशी करता येईल, त्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजेत. एकसंध राष्ट्र म्हणून जात, धर्म बाजूला ठेवून एकत्रित आले पाहिजे. जनमानसातील ग्रंथालय हा अविभाज्य घटक असल्याचे मत माजी राज्यसभा सदस्य तथा मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केले.प्रियदर्शनी महिला महाविद्यालयातील ग्रंथालय विभागाच्यावतीने पाच दिवसीय वेबिनार ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम अ‍ॅण्ड फ्युचर लॉयब्रियनशीप’ यावर आयोजित करण्यात आलेला आहे. याचे सोमवारी ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.प्रा. अमृत देशमुख यांनी मेक इंडिया रिड बुकलेट यावर मार्गदर्शन करताना वाचावे कसे, काय वाचावे, गती काय असावी असे सांगत १३५० पुस्तके वाचल्याचे सांगितले. हातात पुस्तक घेणे म्हणजे वाचन नव्हे. माध्यमाला नाही तर मजकुराला महत्त्व द्या. वाचनाची गती प्रतिमिनीट १२०० शब्द असे म्हणाले.वाचन करताना विचार करू नये, असे सांगत मेक इन इंडिया बिझनेस नाही तर मिशन असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. रंभा सोनाये होत्या. आयोजन डॉ. प्रतिभा ताकसांडे यांनी केले. विदर्भातील हा पहिला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा प्रयोग ठरला. आभार प्रदर्शन प्रा.डॉ. धनंजय सोनटक्के यांनी केले. राज्यातील १०१ ग्रंथपाल आणि प्राध्यापकांनी यात सहभाग नोंदविला आहे.

टॅग्स :Bhalchandra Mungekarभालचंद्र मुणगेकरlibraryवाचनालय