शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

फायनान्सच्या कर्जातून मुक्त करा; महिलांची मागणी

By admin | Updated: December 30, 2016 00:41 IST

काळ्या पैशातून बिनदिक्कत कर्जवाटप करून आर्थिकदृष्ट्या कमकुवत शहरी व ग्रामीण भागातील गरीब

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : कार्यवाहीची मागणी वर्धा : काळ्या पैशातून बिनदिक्कत कर्जवाटप करून आर्थिकदृष्ट्या कमकुवत शहरी व ग्रामीण भागातील गरीब महिलांचे आर्थिक शोषण करणाऱ्या खासगी मायक्रो फायनान्स कंपनीच्या संचालक मंडळातील प्रत्येक सदस्यावर गुन्हा दाखल करावा, वसुली प्रतिनिधींवर फौजदारी कारवाई करावी, या मागणीसाठी बुधवारी महिलांनी आंदोलन केले. झाँशी राणी पुतळ्याजवळ महात्मा कर्जमुक्ती आंदोलन समितीच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले. राज्यातील संपूर्ण महिलांना विनाअट, विनाशर्त कर्जमुक्त झाल्याची घोषणा शासनाने त्वरित करावी. अन्यथा मुंबई येथे १७ जानेवारी रोजी आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी दिलेल्या निवेदनातून देण्यात आला. ग्रामीण भागातील महिलांच्या गळ्याभोवती कर्जाचा फास आवळला आहे. यामुळे महिला मानसिकदृष्ट्या खचल्या असून आर्थिक विवंचनेत आहेत. कर्जाचे हफ्ते भरण्यासाठी महिलांकडे पैसे नसल्याने आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. मायक्रो फायनान्स कंपन्यांनी कर्ज दिल्यानंतर २२ ते ३६ टक्के व्याज आकारले जात आहे. परिणामी, महिलांची मोठ्या प्रमाणात लूट केली जात आहे. कुठल्याही बँक वा सोसायटीकडून जेवढे व्याज आकारले जात नाही, तेवढे व्याज मायक्रो फायनान्स कंपन्या आकारत आहेत. महिलांकडून आधार, मतदान कार्ड तसेच फोटो घेऊन कर्ज न भरल्यास तुमच्या राहत्या घरावर ताबा करण्यात येईल. तुमच्या मुलांना शासकीय सेवेत लागू देणार नाही. नोकरी मिळू देणार नाही, अशा धमक्या दिल्या जात आहे. यामुळे सर्व गैरव्यवहार व गैरप्रकाराची विशेष समिती नेमून चौकशी करावी, संपूर्ण मायक्रो फायनान्स कंपन्यांना महाराष्ट्रातून हद्दपार करण्यात यावे, अशी मागणी यावेळी महिलांकडून करण्यात आली. यावेळी महिलांनी झाँशी राणी पुतळ्यासमोर पोस्ट आॅफिस चौकात आंदोलन केले. आंदोलनात संजय आठवले, सादिक ठेकेदार, प्रवीण हावरे, शबाना खान, अजीम करीम आदींसह मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग होता.(स्थानिक प्रतिनिधी)