आमदारांचे आश्वासन : वैरागड येथे कार्यक्रमवैरागड : गडचिरोली जिल्ह्याला मागासलेला जिल्हा म्हणून हीनवले जाते. मागास म्हणून जिल्ह्याची ओळख बाहेर निर्माण झाली आहे. जिल्ह्याचा विकास साधण्यासाठी महिला व पुरूष गटांचे बळकटीकरण होणे गरजेचे आहे. या दृष्टीने महिला व पुरूष गटांना सक्षम करण्यासाठी पुढाकार घेऊ, असे आश्वासन आ. क्रिष्णा गजबे यांनी दिले. आर्थिक विकास महामंडळद्वारा संचालित जीवनज्योती लोकसंचालित साधन केंद्र वैरागड यांच्या वतीने आयोजित सभेच्या उद्घाटनप्रसंगी आ. गजबे बोलत होते. या कार्यक्रमाला प्राचार्य डी. के. मेश्राम, जीवन नाकाडे, डॉ. संगीता रेवतकर, गजभिये, माविमच्या कांता मिश्रा, सरपंच माणिक पेंदाम, भामराज हर्षे, आडे, नंदू पेट्टेवार, डॉ. अढळे, रागिनी कुमरे, धुर्वे, संगीता धुर्वे, उत्तरा मारगाये, सरोज भैसारे उपस्थित होत्या. पुढे बोलताना आ. क्रिष्णा गजबे म्हणाले, महिलांनी आपल्यातील कौशल्याचा विकास करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन वैयक्तिक, सामाजिक उन्नती साधावी. महिलांना याकरिता सहकार्य लागल्यास आपण सहकार्य करू, असे आश्वासही आ. गजबे यांनी दिले. आपल्या कौशल्यानुसार महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून उद्योग व व्यवसाय करावा व प्रगती साधावी, असे आवाहन डॉ. संगीता रेवतकर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन सुषमा नरूले, प्रास्ताविक यामिनी मातेरे यांनी केले. यशस्वीतेसाठी वनिता धुर्वे, दुर्गा कहालकर, दीपाली कुमरे, जीजा सिडाम, महावंता कोटांगले, सुनीता भानारकर, अनिता नवघरे, लता उसेंडी यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)
बचत गटांना सक्षम करण्याचा प्रयत्न करू
By admin | Updated: October 30, 2016 01:29 IST