शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पाल यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 23:11 IST

हास्यकलाकार सुनील पाल यांच्या भगिनी शारदा पाल यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात सर्वोतोपरी उपचार करण्यात आले. परंतू त्या उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने त्यांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देराजीव बोरले : आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाची पत्रपरिषद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : हास्यकलाकार सुनील पाल यांच्या भगिनी शारदा पाल यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात सर्वोतोपरी उपचार करण्यात आले. परंतू त्या उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने त्यांचा मृत्यू झाला. या सर्व घटनेसाठी सावंगी रुग्णालयाला जबाबदार ठरवित सुनील पाल यांनी व्हिडीओ व्हायरल करायला सुरुवात केली आहे. यात रुग्णालयासह संस्थाप्रमुख माजी खासदार दत्ता मेघे यांचीही बदनामी चालविली आहे. ही बाब गंभीर असून याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यासह सुनील पाल यांच्याविरुध्द मानहानीचा दावा करणार, अशी माहिती दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. राजीव बोरले यांनी पत्रकार परिषदेत दिली.हास्य कलाकार सुनील पाल यांची बहीण शारदा पाल यांची प्रकृती आठ दिवसापूर्वीच खालावली होती. त्यांना गंभीर अवस्थेत ७ नोव्हेंबरला पहाटे ३ वाजता सावंगीच्या रुग्णालयात आणण्यात आले. त्यांना अतिदक्षता विभागात दाखल केल्यानंतर औषोधोपचार सुरु केले पण, त्या प्रतिसाद देत नसल्याची माहिती नातेवाईकांना दिली होती. त्यानंतर ८ नोव्हेंबरला दुपारी सुनील पाल रुग्णालयात आले. त्यांनी कोणाचीही भेट न घेता अतिदक्षता विभागात जाऊन गोंधळ घालायला सुरुवात केली. त्यांनी रुग्णालयात आरोग्य सेवा मिळत नाही. येथे अप्रशिक्षीत डॉक्टर सेवा देतात, असे आरोप करीत व्हिडीओ तयार करुन तो व्हायरल केला. विशेषत: त्यांच्या बहिणीवर या रुग्णायात केवळ ३६ तासच उपचार करण्यात आले. त्यापूर्वी हिंगणघाटच्या तुळसकर हॉस्पीटलमध्ये उपचार झाले. त्यांना या रुग्णालयात सर्व सुविधाही देण्यात आल्या व सहकार्यही केले. इतकेच नाही तर त्यांच्या बहिणीचा मृत्यू हा या रुग्णालयाच्या बाहेर झाला आहे. असे असतानाही त्यांनी रुग्णालयालासह येथील डॉक्टरांना दोष देत बदनामी करण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यामुळे खरच आमची चूक असेल तर आमच्यावर कारवाई व्हावी, सर्व चौकशी व कारवाईला सामोरे जाण्यास आम्ही तयार आहे. पण, पाल यांनी बदनामी थांबवावी. त्यांच्या विरुध्द आम्ही कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही यावेळी बोरले म्हणाले. या पत्रकार परिषदेला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदिप श्रीवास्तव, रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे, जनसंपर्क अधिकारी संजय इंगळे तिगावकर, डॉ. सुनील कुमार, डॉ. टी. के. कांबळे उपस्थित होते.रुग्णाला आमच्याकडे सहकार्यच करण्यात आलेसावंगी रुग्णालय हे टिचिंग हॉस्पीटल आहे. सुनील पाल यांच्या व्हीडीओमध्ये दिसणारे आयसीयुतील आॅन ड्युटी असलेले आदित्य भागवत हे डॉक्टर असून सध्या मेडिसिनमध्ये पीजी करीत आहेत. रुग्णालयात शारदा यांची पूर्ण काळजी घेण्यात आली व योग्य तेच उपचार करण्यात आले. रुग्णाची अवस्था हाताबाहेर गेल्यानंतर रुग्णाला दवाखान्यात आल्यावरही आमच्याकडून सहकार्यच करण्यात आले, अशी माहिती याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप श्रीवास्तव यांनी दिली.