शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

नाफेडच्या तूर खरेदीकडे शेतकऱ्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 23:48 IST

गत वर्षी नाफेडच्या तूर खरेदीचा सावळागोंधळ पाहता यावर्षी शेतकऱ्यांनी नाफेडच्या तूर खरेदी केंद्राकडे पूर्णत: पाठ फिरविल्याचे दिसत आहे. यात नाफेडने तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांसाठी ११ क्विंटलची अट ठेवल्याने शेतकऱ्यांची पंचाईत झाली आहे.

ठळक मुद्दे६४ शेतकऱ्यांकडून केवळ ६५५ क्विंटलची आवक

सुरेंद्र डाफ।लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : गत वर्षी नाफेडच्या तूर खरेदीचा सावळागोंधळ पाहता यावर्षी शेतकऱ्यांनी नाफेडच्या तूर खरेदी केंद्राकडे पूर्णत: पाठ फिरविल्याचे दिसत आहे. यात नाफेडने तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांसाठी ११ क्विंटलची अट ठेवल्याने शेतकऱ्यांची पंचाईत झाली आहे. यामुळे आतापर्यंत ६५५ क्विंटल तुरीची आवक झाली असल्याचे दिसून आले आहे.या अडचणीमुळे यंदा उर्वरित तूर कुणाला विकावी या पेचात शेतकरी सापडले आहे. शासनाने आता शेतकºयांची निम्मी तूर खरेदी करण्याची अट शिथील करण्याची घोषणा केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण तूर खरेदी करण्यासंबंधीचे आदेश कृषी उत्पन्न बाजार समित्यांना प्राप्त झाले आहे.तूर खरेदीसाठी निम्या क्षेत्राची अट शासनाने शिथील केली आहे. यात शेतकऱ्यांच्या शेतातील सर्व उत्पादित तूर खरेदी करण्याचे आदेश देण्यात आले; परंतु अद्यापही त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात न आल्याने शेतकरी आपल्या शेतातील तूर पीक खाजगी व्यापाऱ्यांना कमी भावाने विकत आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी नाफेडच्या तूर खरेदीची ही योजना पूर्णत: फसली असल्याचे सध्या दिसत आहे. शासकीय तूर खरेदी ही कृषी उत्पादनानुसार करण्यात यावी, असे आदेश होते. यात नव्याने सुधारणा करून शेतकऱ्यांची सर्व तूर खरेदी करण्याचे आदेश दिले.आर्वीत नाफेडच्या तूर खरेदीकडे पाठ फिरविली आहे. आर्वीत ५ फेब्रुवारीपासून नाफेडच्या तूर खरेदीचा प्रारंभ झाला. आर्वीत नाफेडकडे आतापर्यंत १३०० शेतकऱ्यांनी तूर विकली आहे. आतापर्यंत फक्त ६४ शेतकऱ्यांची ६५५.८९ किलो तूर नाफेडने खरेदी केली आहे. याउलट खाजगी व्यापाऱ्यांनी आतापर्यंत ४,६५१ क्विंटल तूर खरेदी केली आहे. यावर्षी तूर पिकावर अज्ञात रोगाचे आक्रमण झाल्याने अपेक्षित तूर पीक शेतकऱ्यांच्या पदरी पडले नाही.दरवाढीच्या अपेक्षेत तूर घरीचयंदा तुरीचे उत्पादन कमी झाल्याने चांगले दर मिळतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी त्यांची तूर हमीभावात देण्यापेक्षा घरीच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यात येत्या दिवसात तुरीला दर मिळतील अथवा असलेल्या दरातही घट होते याकडे तर उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.शेतकऱ्यांच्या तूर खरेदीसाठी जाचक अट पाहता पूर्ण क्षेत्र गृहित धरणार असल्याची अंमलबजावणी करण्यात आली; परंतु अद्याप तसेच लेखी आदेश आले नाही. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी नाफेडला तूर खरेदीचा फारसा प्रतिसाद नाही.- विनोद कोटेवारप्रभारी सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, आर्वी.