शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफी मिळालेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्ज द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 00:04 IST

राज्य शासनाने शेतकऱ्यांची बँकेतील पत निर्माण करण्यासाठी शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली. जिल्ह्यातील ८० हजार २९० शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला असून सर्व बँकांनी पात्र आणि अर्ज करणाऱ्या सर्व गरजू शेतकऱ्यांना या खरीप हंगामात कर्ज वितरण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी दिलेत.

ठळक मुद्देविवेक भिमनवार : विविध योजनांची आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्य शासनाने शेतकऱ्यांची बँकेतील पत निर्माण करण्यासाठी शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली. जिल्ह्यातील ८० हजार २९० शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला असून सर्व बँकांनी पात्र आणि अर्ज करणाऱ्या सर्व गरजू शेतकऱ्यांना या खरीप हंगामात कर्ज वितरण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी दिलेत.पीक कर्ज वाटप, कर्जमाफी, पीएम किसान आदी योजनांचा आढावा जिल्हाधिकारी यांनी घेतला. सर्व बँकांनी त्यांच्या शाखानिहाय पीक कर्ज वाटपाची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात द्यावी. तसेच एखाद्या शेतकऱ्यांचा पीक कर्ज नाकारण्याचे कारण द्यावे. रिझर्व्ह बँकेच्या कोणत्याही परिपत्रकामुळे शेतकऱ्यांना पीककर्ज वितरण करताना अडचणी येत असतील तर त्याची माहिती तात्काळ शासनाला कळविण्यात यावी. शेतकऱ्यांना वेळीच कर्ज पुरवठा होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘अर्ज द्या कर्ज घ्या’ हे अभियान राबविण्यात येत आहे. शेतकºयांना बँकेमध्ये येणाऱ्या अडचणीचे निराकरण करणे आणि अभियानाच्या योग्य अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील सर्व बँकेच्या १३९ शाखांसाठी प्रत्येक शाखानिहाय संपर्क अधिकऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तहसीलदारांनी त्यांच्या तालुक्यातील प्रत्येक बँक मॅनेजर आणि संपर्क अधिकारी यांची आठवड्यातून एकदा बैठक घेऊन कर्ज वाटपाचा आढावा घ्यावा, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सागितले. आजपर्यंत केवळ ६.८ टक्केच पीक कर्ज वाटप झाले असून याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून बँकांनी शाखानिहाय मेळावे घेण्याचे निर्देश दिलेत. बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी संजय दैने, उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, लीड बँक मॅनेजर बिरेंद्रकुमार, जिल्हा उपनिबंधक वालदे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज