शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

पट्टेदार वाघाने केले युवकाला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2022 05:00 IST

लक्ष्मण हा बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे शेळ्यांसाठी चारा आणण्यासाठी गावाजवळच असलेल्या तलाव रस्त्यावरील शेतात गेला होता. तो शेळ्यांसाठी चारा कापत असताना गव्हाच्या उभ्या पिकात लपून असलेल्या पट्टेदार वाघाने त्याच्यावर हल्ला चढविला. लक्ष्मण याने आरडाओरड केली असता परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. या घटनेत लक्ष्मण याचा जागीच मृत्यू झाला. वाघाने लक्ष्मणला गतप्राण केल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांसह वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घाडगे) : शेळ्यांसाठी चारा आणण्यासाठी गेलेल्या युवकावर पट्टेदार वाघाने हल्ला करून त्यास गतप्राण केले. ही घटना बुधवारी सकाळी तालुक्यातील कन्नमवारग्राम शिवारात घडली असून, लक्ष्मण महादेव हुके (३५) असे मृत युवकाचे नाव आहे.लक्ष्मण हा बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे शेळ्यांसाठी चारा आणण्यासाठी गावाजवळच असलेल्या तलाव रस्त्यावरील शेतात गेला होता. तो शेळ्यांसाठी चारा कापत असताना गव्हाच्या उभ्या पिकात लपून असलेल्या पट्टेदार वाघाने त्याच्यावर हल्ला चढविला. लक्ष्मण याने आरडाओरड केली असता परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. या घटनेत लक्ष्मण याचा जागीच मृत्यू झाला. वाघाने लक्ष्मणला गतप्राण केल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांसह वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या घटनेची नोंद वनविभागाने घेतली आहे. मागील दोन वर्षांत कारंजा तालुक्यातील ही चौथी घटना आहे. यापूर्वी आगारगाव येथे युवकाला, तर राहटी येथे गुरख्याला तसेच नांदोरा येथे एका व्यक्तीला वन्य प्राण्याने ठार केले आहे. 

हुके कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर, गावात हळहळ-    लक्ष्मण हुके हा भूमिहीन असून तो रोजमजुरी करून कुटुंबाचा गाडा हाकलत असे. इतकेच नव्हे तर त्याने उदरनिर्वाहासाठी शेळीपालनाची जोड दिली होती; पण या घटनेमुळे हुके कुटुंबावर दु:खाचा डोंगरच कोसळला आहे.

मृताच्या कुटुंबीयांना दिली तातडीची ५० हजारांची मदत-    घटनेनंतर संतप्तांनी लक्ष्मणचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्यावर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मृत लक्ष्मणच्या कुटुंबीयांना तातडीची शासकीय मदत म्हणून ५० हजार रुपयांचा धनादेश दिला. 

संतप्तांनी मोडली वनविभागाच्या नावाने बोटे-   कन्नमवारग्राम हे गाव जंगलव्याप्त भागात असून नेहमीच या भागात वन्यजीव आणि मानवांत संघर्ष होतात. या भागातील वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी असतानाही त्याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप यावेळी संतप्तांनी केला. त्यामुळे काही काळाकरिता परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. बुधवारी घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

लक्ष्मण हुके याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. मृताच्या कुटुंबीयांना ५० हजारांची तातडीची मदत दिली असून शासकीय नियमांनुसार पाच लाखांची शासकीय मदत देण्यात येईल. शिवाय मृताच्या पत्नीला रोजमजुरीच्या कामावर घेतले जाणार आहे. मानव-वन्यजीव संघर्ष टाळता यावा, या हेतूने वनरक्षकाच्या नेतृत्वात पाचसदस्यीय पथकाची नेमणूक करण्यात येणार आहे.- गजानन बोबडे, साहाय्यक वनसंरक्षक, वर्धा.

 

टॅग्स :Tigerवाघ